Xiaomi Mi A2 घ्यायचाय! विक्री आज 12 वाजल्यापासून, पहा काय आहे खास...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:21 AM2018-08-16T11:21:50+5:302018-08-16T11:34:42+5:30

Mi A2 हा गेल्या वर्षी लाँच केलेल्या Mi A1 या फोनचे अपडेटेड व्हर्जन आहे

Xiaomi Mi A2 Selling today at 12 o'clock, see what's special ... | Xiaomi Mi A2 घ्यायचाय! विक्री आज 12 वाजल्यापासून, पहा काय आहे खास...

Xiaomi Mi A2 घ्यायचाय! विक्री आज 12 वाजल्यापासून, पहा काय आहे खास...

googlenewsNext

नवी दिल्ली :  चीनची मोबाईल उत्पादनात अग्रेसर असलेली कंपनी Xiaomi ने नुकत्याच लाँच केलेला Xiaomi Mi A2 हा फोन आज दुपारी 12 वाजता पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. एमआयची वेबसाईच आणि त्यांचे अधिकृत ऑनलाईन विक्रेत्याकडे या फोनची खरेदी करता येणार आहे. Mi A2 हा गेल्या वर्षी लाँच केलेल्या Mi A1 या फोनचे अपडेटेड व्हर्जन आहे.


शाओमी कंपनीने Mi A2 हा फोन गेल्या महिन्यात स्पेनमध्ये लाँच केला होता. यानंतर मगील आठवड्यात तो भारतात लाँच केला गेला. यानंतर आगाऊ नोंदणी सुरु झाली होती. Mi A2 मध्ये चार जीबी रॅम आणि 64 जीबी रोम स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे. फोनसोबत एक कव्हरही मिळणार आहे. दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. चार जीबीच्या फोनची किंमत 16,999 ठेवण्यात आली आहे, तर सहा जीबीच्या फोनची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. तसेच फोन काळा, सोनेरी, निळा आणि रोज गोल्ड रंगामध्ये उपलब्ध आहे.


 या फोनमध्ये 5.99 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले 205 डी कर्व्ह ग्लास सोबत असणार आहे. क्वालकॉम ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर दिला आहे. तो 1.8 गीगाहर्ट्झ एवढ्या वेगाने चालतो. ग्राफिक्ससाठी 512 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा
मागील कॅमेरा 20 आणि 12 असा ड्युएल मेगापिक्सल अपर्चर एफ/1.75 सोबत, तर सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सल अपर्चर एफ/1.75 सोबत येणार आहे. सेल्फीसाठी सॉफ्ट एलईडी फ्लॅश आणि सोनी IMX376 सेंसर वापरण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा एआय फिचरने संपन्न आहेत. 

सुरक्षा

शाओमी मी ए2 मध्ये अँड्रॉईड 8.1 ओरियो ही प्रणाली वापरण्यात आली आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक सारख्या सुरक्षेच्या सुविधाही आहेत. तसेच या फोनची बॅटरी 3010 एमएएच एवढी आहे. जी साधारण दिवसभर चालू शकते.

Web Title: Xiaomi Mi A2 Selling today at 12 o'clock, see what's special ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.