Diwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:39 PM2018-10-23T16:39:55+5:302018-10-23T16:41:24+5:30

Diwali with Mi sale: शाओमी मोबाइल कंपनीने दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. या सेलचे आयोजन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे.

Xiaomi Diwali with Mi flash sale today: buy Poco F1 at just Re 1 on Mi.com | Diwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन

Diwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन

Next

मुंबई : शाओमी मोबाइल कंपनीने दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. या सेलचे आयोजन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे. या सेलची सुरुवात संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरु होणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी मोठ्या डीलच्या स्वरुपात शाओमीचा Poco F1 स्मार्टफोन 1 रुपयामध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 

Xiaomi Poco F1 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स...
ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या Xiaomi Poco F1 स्मार्टफोनमध्ये अँड्राइड 8.1 ओरिओ बेस्ड 9.6 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांना Android P चे अपडेट देण्यात येणार आहे. Xiaomi Poco F1साठी MIUI चे कस्टमाइज्ड व्हर्जन वापरले आहे. 2.D कव्हर्ड गोरिल्ला ग्लास 3 सोबत 6.18 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम ऑप्शनसोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर दिला आहे. तो लिक्विडकूल टेक्नोलॉजीसह इंटीग्रेडेट आहे.  

फोटोग्राफीसाठी रिअरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल दिला आहे. फेस अनलॉक फीसरसाठी आयआर लाइट देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी एचडीआर आणि एआय ब्यूटी फीचर दिले आहे. याशिवाय, स्मार्टफोन 64GB/ 128GB/ 256GB स्टोरेजला कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढविता येते.  कनेक्टिव्हिटीसाठी 4G+, VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूट्यूथ v5.0, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन देण्यात येणार आहे. तसेच, बॅटरीची क्षमता  4,000mAh इतकी आहे.  
   

Web Title: Xiaomi Diwali with Mi flash sale today: buy Poco F1 at just Re 1 on Mi.com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.