WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:23 PM2019-03-14T17:23:43+5:302019-03-14T17:30:48+5:30

युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे.

whatspp may implement google reverse image search to combat fake pictures | WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा !

WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा !

googlenewsNext

नवी दिल्ली : जगभरातील पॉपुलर असलेले व्हॉट्सअ‍ॅपने आता नवीन फीचर आणले जाणार आहे. युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी गुगलचे रिव्हर्स इमेज सर्च आहे, यानुसार फोटो खरे आहेत की मार्फ केले आहेत, याची माहिती कळणार आहे. 

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर फेक न्यूज आणि फोटो शेअर करण्यात येत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा गुगल सारखेच करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच व्हॉट्सअॅप कंपनीने नवीन फीचरच्या माध्यमातून फेक माहिती आणि फोटोंवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यार आहे. WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅन्ड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप 2.19.73 अपडेटमध्ये Search Image चा ऑप्शन दिसत आहे. यामध्ये कंपनीकडून गुगल API चा वापर करण्यात येईल अशी शक्यता आहे. कारण, रिव्हर्स सर्च केला जाऊ शकतो. जर असे झाले तर एखादा फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गुगलवर रिव्हर्स सर्च करुन त्यातून फोटोची माहिती घेण्यात येईल. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देण्यात आलेले रिव्हर्स सर्च फीचर कसे काम करणार आहे, त्याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, असे समजते की, फेक फोटोंना काहीप्रमाणात लगाम लावला जाणार आहे. 

WABetainfo च्या माहितीनुसार, एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये  Search Image चा ऑप्शन दिसत आहे. हे बीटा व्हर्जनमध्ये आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा वापरण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप बीटा टेस्टिंग प्रोग्रॉमचा भाग बनवावा लागेल. दरम्यान, हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या फायलन बिल्डमध्ये कधी येणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित दुसऱ्या रिपोर्टनुसार, कंपनीने ग्रुप इनव्हिटेशन सिस्टम सुरु केली आहे. यामध्ये तुम्हाला परवानगीशिवाय कोणत्याही ग्रुपला जाडले जाऊ शकत नाही. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन इनव्हिटेशन ऑन्ली करु शकता. यामुळे कोणालाही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अ‍ॅड करायचे असेल, तर तुम्हाला इनव्हिटेशन येते. 

Web Title: whatspp may implement google reverse image search to combat fake pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.