WhatsApp वर पहिल्यासारखं दिसणार नाही आता मित्रांचं Status, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:33 PM2019-02-18T13:33:05+5:302019-02-18T13:47:09+5:30

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ‘Ranking’ नावाचं एक फीचर लाँच करणार आहे. सध्या या नव्या फीचरची चाचणी सुरू आहे. 

WhatsApp working on new feature that will show Status updates of your friends first | WhatsApp वर पहिल्यासारखं दिसणार नाही आता मित्रांचं Status, 'हे' आहे कारण

WhatsApp वर पहिल्यासारखं दिसणार नाही आता मित्रांचं Status, 'हे' आहे कारण

Next
ठळक मुद्देयुजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ‘Ranking’ नावाचं एक फीचर लाँच करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण ऑनलाईन असताना सर्वात जास्त ज्या कॉन्टॅक्टसोबत चॅट करतो त्यांचं Status सर्वात आधी दिसणार आहे.

नवी दिल्ली - युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने आता आणखी एक जबरदस्त फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ‘Ranking’ नावाचं एक फीचर लाँच करणार आहे. सध्या या नव्या फीचरची चाचणी सुरू आहे. 

नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप Status चं Ranking बदलणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर आपण ऑनलाईन असताना सर्वात जास्त ज्या कॉन्टॅक्टसोबत चॅट करतो त्यांचं Status सर्वात आधी दिसणार आहे. त्यानुसार Status चा क्रम ठरवण्यात येणार आहे. तसेच Ranking ठरवताना अन्य काही गोष्टींचा देखील आवर्जून विचार केला जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप Status चं असं ठरणार Ranking

- सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप युजर एका दिवसात कोणाकोणाशी किती संवाद साधतो यावरून तीन भागात त्याचे Ranking करण्यात येणार आहे. 

- एखादा मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला तर - Normal Ranking , फोटो, व्हिडीओ पाठवले अथवा रिसीव्ह केल्यास - Good Ranking, युजरने एखादा मेसेज इग्नोर केल्यास -  Bad Ranking असणार आहे.

- व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कॉल केल्यास त्याचं Ranking ठरवण्यात येणार आहे. 

- ग्रुपमध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मेसेजला जास्तीत जास्त रिप्लाय दिल्यास त्याचा विचार ही  Ranking ठरवताना केला जाणार आहे. 

WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर येणार, नको असलेल्या ग्रुपपासून सुटका होणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर देखील लवकरच लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर 'Privacy' सेक्शन मध्ये असणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...!

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण अनेकांशी गप्पा मारत असतो. मात्र यामध्ये आपण कोणत्या व्यक्तीशी अथवा ग्रुपमध्ये सर्वात जास्त संवाद साधतो हे आता समजणे अधिक सोपे होणार आहे. 

- आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. 

- व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यानंतर डिस्प्लेवर सर्वात वर तीन डॉट दिसतात त्यावर क्लिक करा. 

- आयफोनचा वापर करत असाल तर होम पेजवर खाली दिलेल्या सेटींग पर्यायावर डबल टॅप करून सेटींगमध्ये जा. 

- सेटींगमध्ये जाऊन डेटा अँड स्टोरेज यूजेस या पर्यायावर क्लिक करा.

- चॅट आणि डेटा यूजेसवर आधारित ग्रुप्स आणि कॉन्टॅक्सची एक लिस्ट मिळेल. त्यामध्ये सर्वाधिक चॅट केलेल्या व्यक्तीची माहिती मिळेल.

- व्हॉट्सअ‍ॅपवर आपण सर्वाधिक गोष्टी शेअर केलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी अथवा ग्रुपविषयी येथे माहिती मिळते. 

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार

व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.
 

Web Title: WhatsApp working on new feature that will show Status updates of your friends first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.