Whatsapp वर नवीन फीचर येणार, फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 04:09 PM2019-07-11T16:09:48+5:302019-07-11T16:12:45+5:30

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड करण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे.

whatsapp quock edit media shortcut feature for android and ios | Whatsapp वर नवीन फीचर येणार, फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार 

Whatsapp वर नवीन फीचर येणार, फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार 

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड करण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. 'क्विक एडिट मीडिया शॉर्टकट' असं या फीचरचं नाव असून यामध्ये फोटो एडिट करता येणार आहे.रिसीव्ह केलेला एखादा फोटो एडिट करून पुढे फॉरवर्ड करणं आता अधिक सोपं होणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड करण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. 'क्विक एडिट मीडिया शॉर्टकट' असं या फीचरचं नाव असून यामध्ये फोटो एडिट करता येणार आहे. विशेष म्हणजे युजर्सना रिसीव्ह सेंड करण्यात आलेले फोटो लगेचच एडिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार 'क्विक एडिट मीडिया शॉर्टकट' हे फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅटवर देखील काम करणार आहे. रिसीव्ह केलेला एखादा फोटो एडिट करून पुढे फॉरवर्ड करणं आता अधिक सोपं होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये फोटो एडिट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. टेक्स्ट अ‍ॅड करण्यासोबतच इमेजसाठी डुडल आणि कॅप्शनपण यामुळे देता येणार आहे. एडिट करण्यात आलेला फोटो फोनमध्ये सेव्ह होणार नसून केवळ ओरिजनल फोटो सेव्ह होणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. 


एडिट बटण हे आयफोन आणि अ‍ॅन्ड्रॉईड व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असलेल्या शेअर आणि फेव्हरेट बटणाच्या बाजूला असणार आहे. मीडिया फाईलवर टॅप केल्यानंतर हे उपलब्ध होणार आहे. या फीचरचा युजर्सना खूप फायदा होणार आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध असलेल्या एडिटींग फीचरला हे रिप्लेस करणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरील हे फीचर अद्याप रोल आऊट करण्यात आलेले नाही. लवकरच हे फीचर येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

use this trick to go invisible if you want to take a break from whatsapp | WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर असंख्य ग्रुप केलेले असतात. मात्र अनेकदा ग्रुपवर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो. ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर लॉग आउट करण्याचा एक पर्याय देण्यात आलेला असतो. व्हॉट्सअ‍ॅप हे स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरू असेपर्यंत चालू असते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपपासून काही वेळ लांब जाण्याचा विचार केला तर त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद करावं लागत अथवा अ‍ॅप डिलीट करावे लागते. मात्र आता या गोष्टी करायची गरज नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींग्समध्ये थोडे बदल केल्यास युजर्स त्यांना हवा तितका वेळ व्हॉट्सअ‍ॅपवरून गायब होऊ शकतात. 

WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर 

WhatsApp वर 'ही' ट्रिक वापरून खास मेसेज करा सेव्ह

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. ग्रुपमध्ये सातत्याने अनेक मेसेज येत असतात. तसेच आपल्या मित्रमैत्रिणांकडून मेसेज येत असतात. पण नवीन मेसेज आल्यावर जुने मेसेज मागे जातात. त्यातील महत्त्वाचे अथवा खास मेसेज हवे असल्यास स्क्रिनशॉट्स काढले जातात. मात्र आता असं करण्याची गरज नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स महत्त्वाच्या मेसेजला बुकमार्क देऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रायव्हेट आणि ग्रुप चॅट अशा दोन्ही ठिकाणी ही फीचर उपलब्ध आहे. याच्या मदतीने युजर्स कोणताही मेसेज सहजपणे दोन वेळा अ‍ॅक्सेस करू शकतात. स्टार मेसेज या नावाने  व्हॉट्सअ‍ॅपवरच हे फीचर ओळखलं जातं. विंडो (Windows), अ‍ॅन्ड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) तीनही प्लॅटफॉर्मवर हे फीचर उपलब्ध आहे.  

whatsapp tricks how to save whatsapp messages through star feature on mobile | WhatsApp वर

WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार

WhatsApp वर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? असं तपासा

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काही कारणास्तव आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना ब्लॉक करू शकतो. त्या व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही. तसेच चॅट म्हणजेच संवाद साधता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत आपण अनब्लॉक करत नाही तोपर्यंत फोटो, व्हिडीओ, मेसेज पाठवता येत नाही. कधी कधी आपण एखादया व्यक्तीला मेसेज करतो पण तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचला आहे की नाही हे समजतच नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने ब्लॉक केल्याची दाट शक्यता असते. आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का? किंवा आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का? हे तपासण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. 
 

Web Title: whatsapp quock edit media shortcut feature for android and ios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.