खूशखबर! एका स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप असे करा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 03:42 PM2018-10-28T15:42:47+5:302018-10-28T15:43:39+5:30

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम असते. त्यामुळे आपण दोन फोन नंबर वापरू शकतो.

whatsapp hidden tricks use two whatsapp account your android smartphone at a time | खूशखबर! एका स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप असे करा सुरू

खूशखबर! एका स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप असे करा सुरू

Next

नवी दिल्ली -  स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम असते. त्यामुळे आपण दोन फोन नंबर वापरू शकतो. व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. मात्र एकाच स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरता येत नाही.  

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी फोनवर ड्यूल अॅप आणि ड्यूल मोडचं फीचर दिलं आहे. शाओमी, सॅमसंग, वीवो, ओप्पो, हुआवे आणि ऑनर सारख्या कंपन्यांनी त्यांच्या काही स्मार्टफोनमध्ये हे फीचर दिलं आहे. ड्यूल अॅप फीचरच्या मदतीने युजर्सना एकाच स्मार्टफोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप वापरण्याची सुविधा मिळते.

अशा प्रकारे एका स्मार्टफोनमध्ये वापरा ड्यूल व्हॉट्सअॅप फीचर 

1. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जा.

2. सेटींगमध्ये App चा पर्याय दिसेल. अॅपवर क्लिक करून ड्यूल अॅपमध्ये जा.

3. तुम्हाला ज्या अॅपचं डुप्लीकेट हवं आहेत तो अॅप सिलेक्ट करा. यामध्ये आता आपल्याला व्हॉट्सअॅप हवे असल्याने व्हॉट्सअॅप सिलेक्ट करा. 

4. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर बॅक जाऊन व्हॉट्सअॅपच्या डुप्लीकेट अॅपच्या लोगोवर क्लिक करा. 

5. अशा प्रद्धतीने तुमची एकाच फोनवर दुसरं व्हॉट्सअॅप वापरू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा फोन नंबर टाकून कॉन्फिगर करा. 

स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या नावाने हे फीचर उपलब्ध आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल मेसेंजर, शाओमीमध्ये ड्यूल अॅप, ओप्पोमध्ये क्लोन अॅप, आसुसमध्ये ट्वीन तर काही फोनमध्ये अॅप सेटींगमध्ये Parallel Apps च्या नावाने हे फिचर उपलब्ध आहे. 

Web Title: whatsapp hidden tricks use two whatsapp account your android smartphone at a time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.