जिओचा डाउनलोडिंग स्पीड नेमका किती? ट्रायने समोर आणला सप्टेंबरचा हा डेटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 07:06 AM2017-12-07T07:06:43+5:302017-12-07T07:07:23+5:30

मोबाइलच्या युगामध्ये इंटरनेटचा वापर देखील फार वाढला आहे. अशावेळी प्रत्येकालाच जास्त स्पीड असणाऱ्या इंटरनेट प्लान हवा असतो. पण सध्या तुम्ही वापरत असलेल्या...

What's the speed of downloading speed? September data collected by TRAI | जिओचा डाउनलोडिंग स्पीड नेमका किती? ट्रायने समोर आणला सप्टेंबरचा हा डेटा!

जिओचा डाउनलोडिंग स्पीड नेमका किती? ट्रायने समोर आणला सप्टेंबरचा हा डेटा!

Next

मुंबई : मोबाइलच्या युगामध्ये इंटरनेटचा वापर देखील फार वाढला आहे. अशावेळी प्रत्येकालाच जास्त स्पीड असणाऱ्या इंटरनेट प्लान हवा असतो. पण सध्या तुम्ही वापरत असलेल्या 4G मोबाइल नेटवर्क स्वस्तात देऊन धमाका करणा-या जिओचा नेमका डाउनलोडिंग स्पीड किती आहे माहीत आहे? जिओचा डाउनलोडिंग स्पीड नेमका किती ही माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये जिओचा नेमका डाउनलोडिंग स्पीड किती याची आकडेवारी नुकतीच  ट्रायनं प्रसिद्ध केली आहे. 

ट्रायच्या आकडेवारीनुसार जोओ हे प्रतिस्पर्धी व्होडाफोनच्या नेटवर्कपेक्षा 2.5 पटीने अधिक वेगवान आहे.  सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओने 21.9 मेगाबाइट प्रति सेकंद असलेल्या सर्व वेळच्या सरासरी 4 जी डाउनलोड स्पीडची नोंद केली आहे. व्होडाफोन 4जी नेटवर्कने नोंदणीकृत सरासरी डाउनलोड गती 8.7 एमबीपीएस आहे

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या माय स्पीड अ‍ॅप्समधून वापरकर्त्यांकडून मिळालेल्या डेटानुसार, सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओ नेटवर्कमध्ये 4 जी डाऊनलोड वेग 1 9 .3 एमबीपीएस वरुन 21.9 एमबीपीएसपर्यंत पोहोचला आहे. आयडिया सेल्युलर आणि भारती एअरटेलचे नेटवर्क्स क्रमश: 8.6 एमबीपीएस आणि 7.5 एमबीपीएस इतके आहे. ट्राय मायस्पीड? प्लिकेशन्सच्या मदतीने रीअल-टाईम आधारावर डाटा डाऊनलोडची गती एकत्रित करते आणि संकलित करते.

अपलोड गतीच्या बाबतीत, आयडिया सेल्युलरने 6.4 एमबीपीएस वेग नोंदवला आहे. जेव्हा एखादा वापरकर्ता सामाजिक मीडिया किंवा ईमेलद्वारे व्हिडिओ किंवा फोटो सामायिक करू इच्छित असतो तेव्हा अपलोड गती महत्वपूर्ण भूमिका बजावते. आयडियानंतर व्होडाफोन (5.8 एमबीपीएस), रिलायन्स जिओ (4.3 एमबीपीएस) आणि भारती एअरटेल (4 एमबीपीएस) यांचा क्रमांक लागतो.

Web Title: What's the speed of downloading speed? September data collected by TRAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jioजिओ