What! Connect smartphone to TV? | काय ! स्मार्टफोन टीव्हीला जोडायचा ?
काय ! स्मार्टफोन टीव्हीला जोडायचा ?

ठळक मुद्देआजकाल टिव्ही देखील फार स्मार्ट झाले आहेत,आता स्मार्ट टिव्हीला      वाय-फाय, स्क्रीन मिररिंग , मिरा कास्ट आदि शेअरिंग साठी वापरले जाणारे तंत्रज्ञान बिल्टईन उपलब्ध आहे. तुमचा टिव्ही स्मार्टटिव्ही असेल आणि त्यावर जर वाय-फाय आणि स्क्रीन मिररिंग किंवा मिरा कास्ट हे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर तुमचे काम अधिक सोपे होइल.आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरील फोटो , व्हिडीओ, मुव्हीज आता तुमच्या टिव्हीवर मोठ्या स्क्रीनवर पाहु शकता.

जेव्हापासुन स्मार्टफोन मधील कॅमेरे अधिकच स्मार्ट झाले तेव्हा पासुन हौशी फोटोग्राफर ची संंख्या प्रचंड वाढली.जो तो आपली फोटोग्राफीची तहान स्मार्टफोन कॅमेराच्या माध्यमातुन भागवु लागला.कुठेही काही वेगळे दिसले कि लगेच तुमच्यातील फोटोग्राफर जागा होतो. लगेच स्मार्टफोन कॅमेराच्या मदतीने पाच-दहा क्लिक होतात आणि लगेच मित्रमंडळी किंवा घरातील सदस्याना वॉटसअ‍ॅप किंवा फेसबुक च्या माध्यमातुन हे फोटोग्राफ शेअर केले जातात.त्याचप्रमाणे तुमच्या घरात एखादा कार्यक्रम असेल तरी लगेच स्मार्टफोन कॅमेराच्या माध्यमातुन त्याचे फोटो काढले जातात तसेच त्याच स्मार्टफोन कॅमेराच्या मदतीने व्हिडिओ शुटिंग देखील केले जाते.मात्र नंतर जेव्हा हे तुम्ही शुट केलेले फोटो किंवा व्हिडिओ निवांत क्षणी तुमच्या घरातील सदस्यांसोबत बघायचे असतात तेव्हा एक तर म्हणजे तुम्ही घरातील सगळे मिळुन एकाच स्मार्टफोनवर हे फोटो आणि व्हिडिओ बघावे लागतील किंवा इतर सदस्यांकडेही जर स्मार्टफोन असतील तर त्यांच्याही स्मार्टफोनवर हे  फोटो किंवा व्हिडिओ ट्रांसफर करता येतील.मात्र जो आनंद सगळ्यांनी एकत्र फोटो किंवा व्हिडिओ एकाच स्क्रीन वर बघण्यात आहे तो असा विभागुन बघण्यात नाही.

तेव्हा तुमच्या मनात कदाचित असा विचार येइल कि तुमच्या घरात जो भलामोठा स्मार्टटिव्ही तुम्ही घेतलेला आहे त्यावर जर हे स्मार्टफोन मधील फोटो किंवा व्हिडिओ बघाता आले तर किती बरे होईल ? सगळयांना एकत्र आनंद घेता येइल.तुमचा स्मार्टटिव्ही जर तुम्हाला स्मार्टफोन म्हणुन वापरता आला तर ? म्हणजेच तुमचा स्मार्टफोन जसाच्या तसा स्मार्टटिव्हीवर दिसला तर अर्थात स्मार्टफोन ची मिरर स्मार्टटिव्ही वर दिसली तर ? आता तंत्रज्ञान येवढे पुढे गेले आहे कि वरिल सर्व प्रश्नांची उत्तरे होय हे शक्य आहे असेच आहे.

हे कसे कराल ?

तसे तर तुमचा स्मार्टफोन तुमच्या स्मार्टटिव्हीला शेअर करण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे जसे कि,गुगलचे अण्ड्राईड स्मार्टफोन साठी क्रोमकास्ट,डि एल एन ए तंत्रज्ञान असलेले टिव्ही आणि स्मार्टफोन.तसेच अनेक असे अनेक डोंगल देखील उपलब्ध आहेत ज्याचा वापर करुन तुम्हाला तुमचा स्मार्टफोन टिव्हीवर शेअर करता येइल.

आजकाल टिव्ही देखील फार स्मार्ट झाले आहेत. पुर्वी टिव्हीला ए व्ही,एच डी एम आय , युएसबी,आदी सुविधा असायच मात्र आता स्मार्ट टिव्हीला      वाय-फाय, स्क्रीन मिररिंग , मिरा कास्ट आदि शेअरिंग साठी वापरले जाणारे तंत्रज्ञान बिल्टईन उपलब्ध आहे.तसेच तुमच्या स्मार्टफोन मध्ये देखील स्क्रीन मिररिंग , कास्ट स्क्रीन आदी आॅप्शन उपलब्ध झाले आहेत ज्याचा वापर करुन तुमचा स्मार्टफोन तुमच्या स्मार्टटिव्ही वर मिरर करणे अधिक सोपे झाले आहे.

तुमचा स्मार्टफोन स्मार्टटिव्हीवर मिररिंग करण्याचा सगळ्यात सोपा आणि कुठलाही अतिरिक्त खर्च न लागणारा प्रकार आपण पाहु. जर तुमचा टिव्ही स्मार्टटिव्ही असेल आणि त्यावर जर वाय-फाय आणि स्क्रीन मिररिंग किंवा मिरा कास्ट हे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर तुमचे काम अधिक सोपे होइल.मात्र त्याचबरोबर तुमच्या स्मार्टफोन वर सुद्धा कास्ट स्क्रीन किंवा स्क्रीन मिररिंग हे आॅप्शन असायला पाहिजे. अण्ड्राईड च्या लेटेस्ट वर्जन मध्ये कास्ट स्क्रीन किंवा स्क्रीन मिररिंग हे आॅप्शन इनबिल्ट उपलब्ध असतात.

जेव्हा तुम्हाला तुमचा स्मार्टफोन मिरर करायचा तेव्हा तुमच्या स्मार्टटिव्ही वर सोर्स मध्ये जाऊन स्क्रीन मिररिंग किंवा मिरा कास्ट यापैकी किंवा तत्सम दुसरे एखादे जे आॅप्शन उपलब्ध असेल  ते सिलेक्ट करुन तुमच्या स्मार्टफोन वर सुद्धा स्क्रीन मिररिंग किंवा कास्ट स्क्रीन हे आॅप्शन इनबल करुन इनबल वायरलेस डिसप्ले ला क्लिक केले असता तुमचा टिव्ही तुम्हाला लिस्ट मध्ये दिसेल . तो सिलेक्ट केला कि तुमचा स्मार्टफोन तुमच्या टिव्हीच्या स्क्रीन वर दिसु लागेल. म्हणजे आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरील फोटो , व्हिडीओ, मुव्हीज आता तुमच्या टिव्हीवर मोठ्या स्क्रीनवर पाहु शकता.


Web Title: What! Connect smartphone to TV?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.