व्ह्यूसॉनिकचे पोर्टेबल प्रोजेक्टर

By शेखर पाटील | Published: May 24, 2018 01:39 PM2018-05-24T13:39:54+5:302018-05-24T13:39:54+5:30

व्ह्यूसॉनिक कंपनीने व्ह्यूसॉनिक एम १ या नावाने नवीन अल्ट्रा पोर्टेबल प्रोजेक्टर भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

Voiconic portable projector | व्ह्यूसॉनिकचे पोर्टेबल प्रोजेक्टर

व्ह्यूसॉनिकचे पोर्टेबल प्रोजेक्टर

googlenewsNext

अलीकडच्या काळात पोर्टेबल प्रोजेक्टरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्‍वभूमिवर, व्ह्यूसोनिक एम १ हे याच प्रकारातील प्रोजेक्टर आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये हर्मन कार्दोन कंपनीची अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली अर्थात ऑडिओ सिस्टीम इनबिल्ट अवस्थेत देण्यात आली आहे. यात ड्युअल स्पीकरचा समावेश आहे. याच्या मदतीने उच्च प्रतिच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे प्रोजेक्टर आकाराने अतिशय आटोपशीर असेच आहे. तसेच याचे वजन फक्त ६८० ग्रॅम असल्यामुळे ते कुठेही सहजपणे नेता येते. याची क्षमता २५० एएनएसआय ल्युमेन्स इतकी आहे. तसेच यातील एलईडी लाईटची ३० हजार तासांची वॉरंटी कंपनीने दिली आहे. यात १२०,००० : १ असा कॉन्ट्रास्ट रेशो प्रदान करण्यात आला आहे. यात शॉर्ट-थ्रो या प्रकारातील लेन्स प्रदान करण्यात आली आहे. यामुळे अगदी कमी जागेतही यावरून चलचित्राचे प्रक्षेपण करता येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

व्ह्यूसॉनिक एम १ या मॉडेलमध्ये दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ६ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यामध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले आहे. कनेक्टीव्हिटीसाठी एचडीएमआय, युएसबी २.०, युएसबी टाईप-सी आदी पर्याय यात आहेत. तर यात इनबिल्ट कार्ड-रीडरदेखील असल्यामुळे मायक्रो-एसडी कार्डमधील कंटेंटचा आनंद घेता येणार आहे. व्ह्यूसॉनिक एम १ हे प्रोजेक्टर ग्राहकांना ४९,००० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.
 

Web Title: Voiconic portable projector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.