मुंबई - टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी  बजेट सुपरवीक टॅरिफ प्लॅन लॉन्च केला आहे. सुपरवीक प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांसाठी असेल. या प्लॅनमध्ये डेटाऐवजी कॉलिंगला जास्त प्राधान्य देण्यात आलं आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल मिळतील तर 500MB डेटा देखील मिळणार आहे. 

सुपरवीक प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग आणि 4G डेटा मिळेल. कंपनीच्या कोणत्याही स्टोअरमधून किंवा मायव्होडाफोन या अॅपमधून या टेरिफ प्लॅनचं रिचार्ज करता येणार आहे. व्होडाफोन प्रमाणे रिलायन्स जिओनेही  एक आठवड्याची व्हॅलिडीटी असलेला प्लॅन आणला आहे. जिओच्या प्लॅनची किंमत 52 रूपये असून यामध्ये 1.05 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.  जिओच्या या प्लॅनमध्ये दरदिवशी 150MB डेटाची मर्यादा आहे. 

विशेष म्हणजे, जिओफोन आणि एअरटेलच्या 4G स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने मायक्रोमॅक्ससोबत पार्टनरशिप करून 999 रूपयांत 4G स्मार्टफोन आणला आहे.    
 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.