Vodafone Red launched a new plan, starting from Rs 499 | व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात
व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात

ठळक मुद्दे व्होडाफोन रेड पोस्टपेड ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लॅनरेड ट्रॅव्हलर, रेड इंटरनॅशनल आणि रेड सिग्नेचरआठ नोव्हेंबर हा प्लॅन मार्केटमध्ये

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. व्होडाफोन कंपनीने आपल्या व्होडाफोन रेड पोस्टपेड ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लॅन आणले आहेत. यामध्ये रेड ट्रॅव्हलर, रेड इंटरनॅशनल आणि रेड सिग्नेचर असे प्लॅन आहेत. व्होडाफोन रेडचे मासिक प्लॅन 499 रुपये आणि 699 रुपयांपासून 2,999 रुपयांपर्यंत आहेत.
व्होडाफोन रेड ट्रॅव्हलरच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना देशभरात रोमिंग आणि कॉलिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, रेड ग्राहकांना 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 जीबी इंटरनेट डेटा, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 35 जीबी इंटरनेट डेटा आणि 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. तसेच, जर काही कारणामुळे तुमच्याकडून महिन्याला डेटा वापरला गेला नाही, तर तो पुढील महिन्यात आपोआप जमा होणार आहे. याशिवाय दर महिन्याला 100 एसएमएस सुद्धा विनाशुल्क पाठविता येणार आहेत.
रेड इंटरनॅशनल प्लॅनमधून ग्राहकांना अमेरिका, कॅनडा, चीन, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरसाठी विनाशुल्क आयएसडी मिनिटांचा फायदा घेता येणार आहे. यामध्ये 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 आयएसडी मिनिट्स आणि 75 जीबी इंटरनेट डेटा, 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 आयएसडी मिनिट्स आणि 100 जीबी इंटरनेट डेटा, 1999 रुपयांच्या 200 आयएसडी मिनिट्स आणि 175 जीबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.
याचबरोबर, 2999 रुपयांच्या रेड सिग्नेचर प्लॅनच्या माध्यमातून 200 आयएसडी मिनिट्स आणि 200 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्लॅनमध्ये रेड टुगेदरचा ऑप्शन निवडून तुमच्या मित्रांना किंवा परिवाराला जोडले की, तुमच्या बिलामध्ये 20 टक्कांची सूट दिली जाणार आहे. याशिवाय तिन्ही नवीन प्लॅनमधून 12 महिन्यांसाठी विनाशुल्क नेटफ्लिक्स सेवा, यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. दरम्यान, कंपनीकडून असे जाहीर करण्यात आले आहे की, आठ नोव्हेंबर हा प्लॅन मार्केटमध्ये आणला जाणार असून भारतातील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील मोबाईल सर्कलमध्ये उपलब्ध नाही आहे. 


Web Title: Vodafone Red launched a new plan, starting from Rs 499
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.