Vodafone is coming with its customers, 4G VoLTE service! | व्होडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, 4G VoLTE सेवा !

ठळक मुद्देजानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा सुरु होणारसुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकचा समावेशबीएसएनएलची 4 जी सेवा येत्या जानेवारीपासून

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सेवा सुरु करणार आहे. येत्या जानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा चालू करणार आहे.
व्होडाफोन ग्राहकांना येणा-या काळात टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सेवा देण्यासाठी सज्ज आहे. वोल्टची सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना डेफिनेशन स्तरीय कॉलिंगचा अनुभव घेता येईल, असे व्होडाफोन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद यांनी सांगितले. तसेच, सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा देशातील काही प्रमुख शहरात राबविली जाणार आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकचा समावेश आहे. 
दरम्यान, रिलायन्स जिओने 2016 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर वोल्टची सेवा सुरु केली. रिलायन्सने सुरु केलेली ही वोल्ट सेवा देशातील पहिली सेवा आहे. त्यानंतर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने गेल्या सप्टेंबर महिन्यात मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चेन्नईमध्ये सुरु केली. याचबरोबर, गेल्या आडवड्यापूर्वी बीएसएनएलने येत्या जानेवारीपासून 4 जी सेवा सुरु करण्याचे जाहीर केले आहे. बीएसएनएलने सुरुवातीला केरळमध्ये 4 जी सेवा सुरु करणार आहे. त्यानंतर ओडिसामध्ये सुरु करणार आहे.