Vivo V7 cost less than two thousand rupees | विवो व्ही७ दोन हजार रूपयांनी झाला स्वस्त
विवो व्ही७ दोन हजार रूपयांनी झाला स्वस्त

 
विवो कंपनीने आपल्या व्ही७ या मॉडेलच्या मूल्यात २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे.
 
विवो कंपनीने नोव्हेंबर महिन्यात विवो व्ही७ हे मॉडेल १८,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केले होते. यात आता २ हजार रूपयांची कपात करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. परिणामी हे मॉडेल आता ग्राहकांना १६,९९० रूपयात मिळणार आहे. हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि शँपेन गोल्ड या रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आधी फक्त फ्लिपकार्टवरून मिळत होता. तथापि, आता याला अमेझॉन इंडिया आणि पेटीएम मॉलवरूनही उपलब्ध करण्यात आले आहे.
 
फिचर्सचा विचार केला असता, विवो व्ही ७ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू १९:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण आहे. या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर असून याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. विवो व्ही ७ या स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपार्चर आणि मूनलाईट ग्लो सेल्फी फ्लॅशयुक्त २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर याचा मुख्य कॅमेरा एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.
 
विवो व्ही ७ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित फनटच ओएस ३.२वर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत.


Web Title: Vivo V7 cost less than two thousand rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.