स्मार्टफोन वापरताय ! मग हे वाचाच

By अनिल भापकर | Published: January 28, 2018 07:51 PM2018-01-28T19:51:46+5:302018-01-28T19:57:18+5:30

एकेकाळी टचस्क्रीन मोबाईल नको रे बाबा म्हणणारे देखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाईल आनंदाने वापरताना दिसत आहेत. टचस्क्रीनमुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज देखील वाढला आहे. कारण पूर्वी मोबाईलचा खालचा अर्धा भाग हा किबोर्डसाठी असायचा.आता टचस्क्रीनमुळे मोबाईलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.अगदी दोन अडीच हजारापासून सुद्धा टचस्क्रीन मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.

Using smartphones! Then this is the verse | स्मार्टफोन वापरताय ! मग हे वाचाच

स्मार्टफोन वापरताय ! मग हे वाचाच

ठळक मुद्देआपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाईल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेस स्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो. टचस्क्रीन मोबाईल स्क्रीन जास्तवेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्वीडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शकतो.

आजकाल जमाना टचस्क्रीनचा आहे. स्मार्टफोन तर टचस्क्रीनचे आहेतच पण आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आदीसुद्धा टचस्क्रीनचे यायला लागलेत. टचस्क्रीन मोबाईल हे इतर फिजीकल किबोड मोबाईलपेक्षा वापरायला सोपे आणि  फास्ट असतात. हल्लीच्या विविध डिक्शनरी अ‍ॅपमुळे तसेच मोबाईलच्या आॅपरेटिंग सिस्टीम मध्येसुद्धा असणाऱ्या  डिक्शनरीमुळे टचस्क्रीनचा टायपिंग स्पीड हा जास्त असतो. त्याचप्रमाणे टचस्क्रीनमुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज देखील वाढला आहे. कारण पूर्वी मोबाईलचा खालचा अर्धा भाग हा  किबोर्डसाठी असायचा आता टचस्क्रीनमुळे  मोबाईलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.
एकेकाळी टचस्क्रीन मोबाईल नको रे बाबा म्हणणारे देखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाईल आनंदाने वापरताना दिसत  आहेत. अगदी दोन अडीच हजारापासून सुद्धा टचस्क्रीन मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाईल वापरणाऱ्यांची  संख्या ही सर्वाधिक आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.

टचस्क्रीनची काय काळजी घ्याल?
1) नखाचा वापर करू नका-
आपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन  हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.
२) हळूच टच  करा-
अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाईल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेस स्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो. मात्र ही मंडळी एवढ्या जोरात टचस्क्रीन प्रेस करतात की, त्यामुळे अनेकांचे टचस्क्रीन खराब देखील झाले आहेत. त्यामुळे टचस्क्रीनला कधीही जोराने प्रेस करून वापरू नका. अगदी आल्हाद स्पर्श केला तरी टचस्क्रीन काम करतो.
३) सूर्यकिरणांचा संपर्क टाळा
टचस्क्रीन मोबाईल स्क्रीन जास्तवेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्वीडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शकतो. त्यामुळे चारचाकी मध्ये प्रवास करताना मोबाईल ज्या  दिशेने ऊन येते त्या ठिकाणी  ठेऊ नका.
४) छोटा कपडा नेहमी जवळ बाळगा
टचस्क्रीन  व्यवस्थित काम करण्यासाठी तो स्वच्छ  असणे गरजेचे असते. धूळ किंवा इतर काही कारणाने टचस्क्रीन अस्वच्छ झाला असल्यास त्याला त्वरित चांगल्या  स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यासाठी मऊ स्वच्छ कपडा  नेहमी जवळ ठेवा तसेच दिवसातून दोन तीन वेळेस टचस्क्रीन साफ  करण्याची सवय लावून घ्या.
5) मोबाईल कव्हर वापरा
टचस्क्रीन मोबाईल असेल तर अशा मोबाईलला कव्हर लावून वापरा. कारण अनेकांना मोबाईल खिशात ठेवायची सवय असते. खिशात  जर आणखी काही वस्तू असतील जसे की किचन, क्वाईन, त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. आजकाल अनेक कंपन्यांच्या मोबाईलसोबत फ्लीपकव्हर येतेच, मात्र नाही आल्यास विकत घेऊन फ्लिपकव्हर लावा. कारण त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मोबाईल हातात पकडतो त्याचा दबावही टचस्क्रीवर येत नाही.
6) स्क्रीन गार्ड वापरा
नवीन स्मार्टफोन विकत घेतला की लगेच दुकानदाराकडून स्क्रीन गार्डची मागणी करा. (विकत घ्या) कारण स्क्रीन गार्ड मुळे टचस्क्रीनचे  लाईफ वाढण्यास मदत होते. हल्ली अनेक महागड्या स्मार्टफोनचे टचस्क्रीन हे स्क्रॅचप्रुफ असतात त्यामुळे त्यांनी स्क्रीनगार्ड नाही वापरले तरी चालते.

Web Title: Using smartphones! Then this is the verse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.