ट्रुकॉलर आता देणार तुमचं प्रोफाईल तपासणाऱ्यांची माहिती, नवं फीचर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 01:18 PM2018-06-22T13:18:24+5:302018-06-22T13:18:24+5:30

ट्रुकॉलरने ट्रुकॉलर प्रो हे नवं व्हर्जन लॉन्च केलं.

Truecaller 'Who Viewed My Profile' feature goes live: Now, track your stalkers | ट्रुकॉलर आता देणार तुमचं प्रोफाईल तपासणाऱ्यांची माहिती, नवं फीचर लॉन्च

ट्रुकॉलर आता देणार तुमचं प्रोफाईल तपासणाऱ्यांची माहिती, नवं फीचर लॉन्च

Next

मुंबई- ट्रुकॉलरच्या माध्यमातून मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या अनोळखी नंबरची माहिती आपल्याला मिळते. एखाद्या व्यक्तीचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह नसेल तर ट्रुकॉलरमुळे लगेचच त्या नंबरबद्दलची माहिती मिळते. विशेष म्हणजे बँकेतून किंवा इतर ठिकाणांहून विविध ऑफर्स सांगणारे विविध फोन कॉल्स ब्लॉक करण्याची सुविधा ट्रुकॉलरवर आहे. ट्रुकॉलरवर फुकटात ग्राहकांना या सर्व सुविधा मिळतात. आता ट्रुकॉलरमध्ये आलेल्या नव्या फीचरच्या माध्यमातून तुमची प्रोफाईल कोण तपासत याबद्दलची माहिती युजर्सला मिळणार आहे. 

ट्रुकॉलरने ट्रुकॉलर प्रो हे नवं व्हर्जन लॉन्च केलं असून त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. पण याचा फायदा म्हणजे तुमची प्रोफाईल कोण व किती वेळा पाहतं हे समजणं सोपं जाणार आहे. इतकंच नाही, तर या फीचरमधील प्रायव्हेट मोडमुळे एखाद्याची प्रोफाईल लपूनही तपासता येईल. म्हणजेच ज्या व्यक्तीची प्रोफाईल तुम्ही पाहता त्या व्यक्तीला याबद्दलची माहिती समजणार नाही. 30 रूपये महिना किंवा 270 रूपये वार्षीक भरून ट्रुकॉलर प्रो डाऊनलोड करता येईल .

ट्रुकॉलवर दिवसाला 100 मिलिअर अॅक्टीव्ह युजर्स आहेत. त्यामुळे हळूहळू पेड सबस्क्रिप्शन वाढवलं जात आहे. 'Who viewed my profile' हे फीचर सध्याच्या वर्जनमध्ये होतं पण नंतर नव्याने डिझाइन करण्यासाठी ते काढून टाकण्यात आलं. 

 'Who Viewed My Profile' फीचर असं करेल काम?

एखाद्या व्यक्तीने ट्रुकॉलवर प्रोफाईल तपासल्यावर युजरला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीने नावाने किंवा नंबर वापरून प्रोफाईल चेक केली आहे. युजरला नोटिफिकेशन मिळण्यासाठी प्रोफाईलवर क्लिक करणं गरजेचं आहे. प्रोफाईल तपासणाऱ्याची माहिती  मिळविण्यासाठी युजरला  Who Viewed My Profile वर क्लिक करायचं आहे. दरम्यान, या फीचरमध्ये युजरला त्यांची खासगी माहिती लपवता येणार आहे. प्रायव्हसी सेटिंगच्या माध्यमातून माहिती देणं टाळता येईल.

Web Title: Truecaller 'Who Viewed My Profile' feature goes live: Now, track your stalkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.