नियमांचे उल्लंघन, TikTok ने 60 लाख व्हिडिओ हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 03:25 PM2019-07-23T15:25:07+5:302019-07-23T15:54:19+5:30

भारतात सध्या टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

tiktok removes 60 lakh videos since july 2018 for violating apps community guidelines | नियमांचे उल्लंघन, TikTok ने 60 लाख व्हिडिओ हटवले 

नियमांचे उल्लंघन, TikTok ने 60 लाख व्हिडिओ हटवले 

googlenewsNext

नवी दिल्ली: टिकटॉकने (TikTok) आपल्या प्लॅटफॉर्म्सवरुन जवळपास 60 लाख व्हिडीओ हटविले आहेत. भारतातील कंन्टेट गाईडलाइनचे उल्लघंन केल्याप्रकरणी टिकटॉकला व्हिडीओ काढावे लागले. टिकटॉकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, कंपनी आपल्या संपूर्ण व्यवस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, टिकटॉकवर येणारा बेकायदा आणि अश्लील कंन्टेट रोखला जाऊ शकेल. 

सरकारने मागितले उत्तर
भारतात सध्या टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने टिकटॉकला  नोटीस पाठविली आहे. यामध्ये अनेक प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरे मागितली आहे. यातील प्रश्न प्रामुख्याने बेकायदेशीर मुलांकडून अश्लील आणि राष्ट्राच्या विरोधी कंन्टेटचा वापर केला जात असल्यासंबंधी आहेत. 

कंपनी चुकीचे कंन्टेट प्रमोट नाही करत
टिकटॉक इंडियाचे सेल्स आणि पार्टनरशिप डायरेक्टर सचिन शर्मा यांनी सांगितले, 'टिकटॉक यूजर्संना टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी सुरक्षित आणि पॉझिटिव्ह इन-अॅप इन्वाइरनमेंट देण्यासाठी प्रत्नशील आहे. कम्युनिटीच्या गाईडलाइन्सचे उल्लंघन होईल, अशाप्रकारचे कोणतेही कंन्टेट टिकटॉक प्रमोट करत नाही. टिकटॉकचे पालकत्व असलेली कंपनी Bytedance ने सांगितले आहे की, भारतात टिकटॉक अॅप जवळपास 20 कोटींवेळी डाऊनलोड झाले आहे. अॅपवर नवीन युजर्स येत असून कंन्टेट ट्रॅफिक सुद्धा वाढत आहे.

60 लाख व्हिडीओ हटविले 
भारतात 10 भाषामध्ये उपलब्ध टिकटॉक अॅपवरील चुकीचा कंन्टेट हा रिलीज होण्याआधीच रोखण्याचे काम सुरु आहे. युजर्सला पॉझिटिव्ह इन-अॅप इन्वाइरनमेंट देण्यासाठी कंपनीने कम्युनिटीच्या गाईडलाइन्सचे उल्लंघन होईल अशाप्रकारचे जवळपास आतापर्यंत 60 लाख व्हिडीओ हटविले आहेत.  

कम्युनिटीच्या गाईडलाइनवर नजर
पोस्ट करण्यात येणारा कंन्टेट नुकसान होईल असा, भडकाऊ भाषण, अश्लील, धमकी किंवा मुलांच्याविरोधात आहे की नाही, याची तपासणी कम्युनिटी गाईडलाइन ट्रान्समिटकडून करण्यात येतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 
 

Web Title: tiktok removes 60 lakh videos since july 2018 for violating apps community guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.