यंदा मार्केटमध्ये येणार तीन नवीन आयफोन; एकामध्ये असतील तीन कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 06:45 PM2019-01-14T18:45:30+5:302019-01-14T18:49:34+5:30

अ‍ॅपल (Apple) कंपनी यंदाच्या वर्षात तीन नवीन iPhone लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे.

Three new iPhones expected in 2019 including one with triple rear camera; iPhone XR successor details surface | यंदा मार्केटमध्ये येणार तीन नवीन आयफोन; एकामध्ये असतील तीन कॅमेरे

यंदा मार्केटमध्ये येणार तीन नवीन आयफोन; एकामध्ये असतील तीन कॅमेरे

Next

नवी दिल्ली : अ‍ॅपल (Apple) कंपनी यंदाच्या वर्षात तीन नवीन iPhone लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. तर, एक आयफोन लो-कॉस्ट एलसीडी मॉडेल असलेला असले. याबाबतची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, आयफोन एक्सआर (iPhone XR) ची म्हणावी तशी मार्केटमध्ये विक्री झाली नाही. त्यामुळे अ‍ॅपल कंपनी LCD iPhone आणि दोन नवीन प्रीमियम मॉडेल मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. हे दोन नवीन प्रीमियम मॉडेल iPhone XS च्या पुढील रेंजमधील असणार आहेत. 

नवीन आयफोनमध्ये असणार ट्रिपल कॅमेरा सेटअप
मोबाईल मार्केटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने प्रीमियम मॉडेलमध्ये पहिला ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्याचे काम करत आहे. iPhone XR  आणि  iPhone XS च्या सक्सेसरमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असणार आहे. या नवीन आयफोनच्या मागीच्या बाजूला दोन कॅमेरे असणार आहेत. याशिवाय, नवीन एलसीडी आयफोनला अपडेट करण्यात येणार आहे. 

 2020 मध्ये एलसीडी आयफोन येणार नाही
रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कंपनी 2020 मध्ये आपल्या आयफोनमधून एलसीडी ऑप्शन ड्रॉप करणार आहे. कंपनी 2020 मध्ये फक्त OLED-Only आयफोन बाजारात आणणार आहे. कारण, OLED टेक्नॉलॉजी चांगल्याप्रकारे काँट्रास्ट आणि कलर रिप्रॉडक्शन ऑफर करते. तर, दुसऱ्या एका लीक रिपोर्टच्या माहितीनुसार, अ‍ॅपल कंपनी आपल्या कॅमेरा सिस्टिमध्ये लाँग डिस्टेंस टाईम ऑफ फ्लाइट () टेक्नॉलाजी इंटिग्रेट करण्यावर भर देत आहे. या फीचर्सचा उपयोग सिक्युरिटी, गेम, एग्युमेंटेड रिअ‍ॅल्टी अ‍ॅप्लिकेशन्समध्ये केला जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Three new iPhones expected in 2019 including one with triple rear camera; iPhone XR successor details surface

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.