Google Safety App स्मार्टफोनला फेक अॅपपासून वाचवण्यासाठी गुगलने आणलं नवं फीचर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:09 PM2018-10-24T15:09:38+5:302018-10-24T15:28:03+5:30

गुगलचं हे नवं फिचर ऑफलाईनही काम करणार आहे. जेव्हा तुम्ही एखादं अॅप डाऊनलोड कराल तेव्हा गुगल प्ले ते अॅप त्वरित ते व्हेरिफाय करतं.

Things You Should Know About Google Latest Security App Intra | Google Safety App स्मार्टफोनला फेक अॅपपासून वाचवण्यासाठी गुगलने आणलं नवं फीचर 

Google Safety App स्मार्टफोनला फेक अॅपपासून वाचवण्यासाठी गुगलने आणलं नवं फीचर 

Next

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. एखादं नवीन अॅप आलं की अनेकजण ते पटकन डाऊनलोड करतात. मात्र आता काही फेक अॅप आले आहेत. या अॅपच्या माध्यमातून अनेकदा युजर्सचा डेटा लीक होण्याची शक्यता असते. मात्र आता अशाच काही फेक अॅपपासून वाचण्यासाठी गुगलने एक नवीन फीचर आणलं आहे. 

गुगलचं हे नवं फीचर ऑफलाईनही काम करणार आहे. जेव्हा तुम्ही एखादं अॅप डाऊनलोड कराल तेव्हा गुगल प्ले ते अॅप त्वरित ते व्हेरिफाय करतं. या नव्या फीचरचा हाच मोठा फायदा आहे. हे फीचर गुगलच्या शेअरिंग अॅप, फाईल गो वर उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच गुगल प्ले स्टोरवर जवळपास 145 अॅप्स मॅलिसस मायक्रोसॉफ्ट विन्डोने प्रभावित आहेत. मात्र हे अॅप अॅन्ड्रॉईड अॅप्ससाठी नुकसानदायक नाही. मात्र कधी कधी ते यंत्रणा खराब करू शकतात. त्यामुळेच गुगलने हे खास फीचर आणलं आहे. 

नव्या फीचरमुळे युजर्स एखादं अॅप डाऊनलोड करत असेल आणि जर ते अॅप फेक असेल तर युजर्संना अनसेफचं नोटीफिकेशन मिळणार आहे. त्यामुळे गुगलच्या या नव्या फीचरमुळे फेक अॅपबाबत युजर्सला एक अलर्ट मिळेल. अॅन्ड्रॉईड युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलने काही दिवसांपूर्वीच Intra नावाचं एक सायबर सिक्युरिटी अॅप लॉन्च केलं आहे. हे अॅप युजर्सचा इंटरनेट स्पीड कमी न करता फेक अॅपपासून वाचण्यासाठी मदत करतं. 

Web Title: Things You Should Know About Google Latest Security App Intra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.