WhatsApp: या फीचर्सने बदलतील तुमच्या चॅट करण्याच्या पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 11:32 AM2018-10-20T11:32:30+5:302018-10-20T11:32:53+5:30

व्हॉट्सअॅप आणखी दमदार करण्यासाठी आणि यूजर फ्रेन्डली करण्यासाठी त्यात सतत वेगवेगळे फीचर्स जोडले जात आहेत.

These whatsapp features will change the style and way of using the app | WhatsApp: या फीचर्सने बदलतील तुमच्या चॅट करण्याच्या पद्धती

WhatsApp: या फीचर्सने बदलतील तुमच्या चॅट करण्याच्या पद्धती

googlenewsNext

फेसबुक भलेही यूजर्स डेटा लीक आणि इतर कारणांमुळे वादात सापडलं असलं, तरी त्यांच्या व्हॉट्सअॅप या इंस्टंट मेसेजिंग अॅपवर याचा तसा काहीही फरक पडला नाहीये. व्हॉट्सअॅप आणखी दमदार करण्यासाठी आणि यूजर फ्रेन्डली करण्यासाठी त्यात सतत वेगवेगळे फीचर्स जोडले जात आहेत. गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅपमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत तर काही दिले जाणार आहेत. या फीचर्समुळे तुमची चॅट करण्याची पद्धत आणखी बदलणार आहे. चला जाणून घेऊ हे फीचर्स....

व्हेकेशन मोड

व्हेकेशन मोड फीचरवर सध्या काम सुरु आहे. व्हॉट्सअॅपचं हे फीचर सायलेंट मोडवर बेस्ड आहे. जे अॅन्ड्रॉईड डिव्हाईसमध्येच आधीच उपलब्ध आहे. असे सांगितले जात आहे की, जेव्हाही हे फीचर रोल आऊट होईल तेव्हा ते अॅन्ड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. हे फीचर यूजरला कोणत्याही अडचणीशिवाय हॉलिडे एन्जॉय करु देण्याची सुविधा देणार आहे आणि त्यामुळेच याचं नाव व्हेकेशन मोड ठेवलं आहे. 

सायलेंड मोड

रिपोर्ट्सनुसार, silent mode फीचर हे रोल आऊट करणं सुरु झालं आहे आणि असेही होऊ शकते की, हे फीचर काही अॅन्ड्रॉईड फोनवर उपलब्धही असू शकतं. हे फीचर व्हेकेशन मोडसोबत काम करणार आहे. जर तुम्ही कुठे फिरायला गेला असाल आणि तिथे तुम्ही मेसेजेस किंवा नोटीफिकेशनने त्रासले असाल तर ते तुम्ही म्यूट करु शकता. 

लिंक्ड अकाऊंट

व्हेकेशन आणि सायलेंट फीचरऐवजी व्हॉट्सअॅप Linked Accounts या फीचरवरही काम करत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही हॉट्सअॅप अकाऊंट इतर सेवांसोबत लिंक करु शकता. या फीचरचं टार्गेट व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप आहे. रोल आऊट झाल्यानंतर हे फीचर प्रोफाइल सेटिंग टॅबमध्ये दिसणार आहे. याचं नेमकं काम असेल याची माहिती समोर आलेली नाहीये. पण रिपोर्ट्सनुसार, फीचरचा वापर पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यासोबतच फीचरच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर तुमचं स्टेटस आपोआप शेअर होईल. 

ग्रुप पार्टिसिपेंट लिस्ट

अॅन्ड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध या फीचरच्या मदतीने ग्रुपमध्ये असलेल्या सर्व मेंबरची लिस्ट लपवली जाऊ शकते आणि त्या जागेवर 'More' लिहिलेलं येतं. त्यावर क्लिक केल्यास पूर्ण लिस्ट दिसते.

स्वाईप टू रिप्लाय

व्हॉट्सअॅप 'Swipe to Reply' या फीचरवर काम करत आहे. ह फीचर आयफोनमध्ये आधीच उपलब्ध झालं आहे. अॅन्ड्रॉईड बीटावरही हे उपलब्ध आहे आणि आता हे फीचर अॅन्ड्रॉईड डिव्हाईसेसवरही येण्यास तयार आहे. 

व्हॉट्सअॅप स्टेटस जाहिराती

काही रिपोर्ट्सनुसार, आता व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपडेटच्या रुपात जाहिरातही दिसणार आहे. पण याबाबत अधिकृत काहीही माहिती समोर आली नाहीये.

​PiP मोड

Picture-in-picture किंवा ​PiP मोडने यूजर्स व्हिडीओ बघताना किंवा व्हिडीओ चॅटींग करताना स्क्रीनवर एक छोट्या बॉक्समध्ये कॉन्टेट ब्राऊज करायची, व्हिडीओ बघण्याची किंवा काही वेगळं करण्याची सुविधा मिळेल. ​PiP साठी यूजर अॅस्पेक्ट रेशो सुद्धा सेट करु शकतील.

Web Title: These whatsapp features will change the style and way of using the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.