मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक (Rs 8990) - तुमचं बजेट जर अगदी दहा हजारापर्यंत असेल तर तुमच्यासाठी मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक सर्वोत्तम आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 11.6 इंचाचा असून विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच इंटेल अॅटॉम प्रोसेसर 2 जीबी रॅम 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच या लॅपटॉपची बॅटरी लाईफ दहा तासांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचबरोबर स्पीकर्स वेबकॅम वायफाय आणि ब्लूट्युथची सोय करण्यात आली आहे.