SBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:45 PM2019-03-13T16:45:04+5:302019-03-13T17:06:03+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या बँक खातेदारांना एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

state bank of india warns about whatsapp scam that seeks banking detailsof users | SBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान! 

SBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान! 

Next
ठळक मुद्देSBIचा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावधान! फसवणुकीच्या तक्रारी करण्यासाठी 1800-11-1109 वर कॉल करु शकता. 'Problem'  असे लिहून  9212500888 वर एसएमएस पाठवू शकता.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या बँक खातेदारांना एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हा मेसेज ग्राहकांची फसवणूक करुन बँकिंग डिटेल्स काढून घेऊ शकतो. त्यामुळे बँक खातेदारांनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन येणाऱ्या मेसेजला कोणताही ओटीपी शेअर करु नये, असे बँकेकडून सांगण्यात येत आहे. 

हा मेसेज पहिल्यांदा ग्राहकांनी ओटीपी संबंधित माहिती देऊन सतर्क करतो. त्यानंतर ग्राहकांनी भरोसा केल्यानंतर ओपीटी शेअर करण्यास सांगण्यात येते. हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सतत कोणत्याही लिंक सोबत येतो. ज्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये कोणतेतरी अ‍ॅप इंस्टॉल होते. या अ‍ॅपच्या मदतीने हॅकर्स फोनमधून ओटीपी चोरी करु शकतात. 

याचबरोबर, फसवणूक करणारा व्यक्ती ग्राहकांसोबत बँक कर्मचारी असल्याचे भासवतो. त्यानंतर ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड रिन्यू किंवा अपग्रेड करण्याचे कारण देत बँकेचे डिटेल्स मागतात. यामध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि कार्डची एक्सपायरी डेट विचारली जाते. यानंतर कोणत्याही टेक्स्ट किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज येण्यासंदर्भात विचारले जाते आणि सांगितले जाते की हे कार्ड अपग्रेडचे कंफर्मेशन आहे. 

त्यानंतर स्कॅमरकडून येणाऱ्या मेसेजच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कार्ड अपग्रेड कन्फर्म करण्यासाठी सांगितले जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर स्कॅमरची मदद करणारा अ‍ॅप बॅकग्राऊंडला इंस्टॉल होतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून ओटीपी स्कॅमरला मिळतो. अशा पद्धतीने कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि एक्सपायरी डेट पासून ओटीपीपर्यंत सर्व माहिती स्कॅमरजवळ पोहोचते. त्यामुळे स्कॅमर काहीही अनऑथराइज्ड ट्रांजक्शन करु शकतात. 

जर तुमच्यासोबत अशी घटना घडली असेल तर तीन दिवसाच्या आत तक्रार दाखल केली पाहिजे. असे केले तरच आपल्याला रिफंड क्लेम करता येऊ शकतो. अशा फसवणुकीच्या तक्रारी करण्यासाठी 1800-11-1109 वर कॉल करु शकता. तसेच, बँक कर्मचाऱ्याजवळ तक्रार दाखल केली जाऊ शकते.  याशिवाय,  'Problem'  असे लिहून  9212500888 वर एसएमएस पाठवू शकता. तसेच, एसबीआयच्या ट्विटरवर @SBICard_Connect तक्रार करु शकता.  
 

Web Title: state bank of india warns about whatsapp scam that seeks banking detailsof users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.