इंडस प्रणालीच्या किबोर्डवर स्पीच-टू-टेक्स्ट फिचर

By शेखर पाटील | Published: August 18, 2017 11:59 AM2017-08-18T11:59:48+5:302017-08-18T12:03:18+5:30

इंडस या ऑपरेटींग सिस्टीमच्या किबोर्डवर आता २३ भाषांसाठी स्पीच-टू-टेक्स्ट ही सुविधा प्रदान करण्यात आली असून यामुळे व्हाईस कमांडचा उपयोग करून टाईप करणे शक्य होणार आहे.

speech to text feature on Indus Key Board | इंडस प्रणालीच्या किबोर्डवर स्पीच-टू-टेक्स्ट फिचर

इंडस प्रणालीच्या किबोर्डवर स्पीच-टू-टेक्स्ट फिचर

Next

इंडस या ऑपरेटींग सिस्टीमच्या किबोर्डवर आता २३ भाषांसाठी स्पीच-टू-टेक्स्ट ही सुविधा प्रदान करण्यात आली असून यामुळे व्हाईस कमांडचा उपयोग करून टाईप करणे शक्य होणार आहे.

इंडस ही स्वदेशी ऑपरेटींग सिस्टीम आहे. ही प्रादेशीक भाषांसाठी विकसित करण्यात आलेली जगातील पहिलीच प्रणाली आहे हे विशेष. भारतात इंडस प्रणालीचे अँड्रॉइड पाठोपाठ युजर्स आहेत. विशेष म्हणजे आयओएसलाही इंडस प्रणालीने मागे टाकले आहे. गुगलने अलीकडेच व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने आपले मुख्य सर्च अ‍ॅप तसेच जीबोर्ड या किबोर्डवर स्पीच-टू-टेक्स्ट या प्रकारची सुविधा प्रदान केली आहे. याच्या ताज्या अपडेटमध्ये मराठीसह अन्य ८ भारतीय भाषांना या फिचरचा सपोर्ट देण्यात आला आहे. या पार्श्‍वभुमिवर इंडस प्रणालीने थेट २३ भारतीय भाषांसाठी याच प्रकारचे फिचर प्रदान केले आहे. यात ११ प्रमुख प्रादेशिक भाषांसह अन्य भाषांचा समावेश आहे. यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तेलगू, तामिळ, उर्दू, नेपाळी, बोडो, डोगरी, संस्कृत, कोकणी, मैथिली, सिंधी, काश्मिरी, अरेबिक, संथाली आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आहे.

इंडस प्रणालीचा वापर करणार्‍या विद्यमान युजर्सला हे फिचर लवकर मिळणार असून नवीन स्मार्टफोनमध्ये मात्र ही सुविधा देण्यात आली आहे. इंडस प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोनची निर्मिती मायक्रोमॅक्स, इंटेक्स, सेलकॉन, स्वाईप, कार्बन आणि ट्रायो या कंपन्यांनी केली असून त्यांच्या मॉडेल्समध्ये हे फिचर वापरता येईल. याशिवाय ताज्या अपडेटमध्ये इंडस प्रणालीच्या युजर्सला किबोर्डसाठी काही नवीन फिचर्स मिळाले आहेत. यात आता जीआयएफ अ‍ॅनिमेशनसह स्टीकर्सचा वापर करता येणार आहे. इंडस प्रणालीने अलीकडेच युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. यात आता स्पीच-टू-टेक्स्ट या फिचरची भर पडली असून या माध्यमातून डिजीटल इंडिया या मोहिमेला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन या कंपनीचे सहसंस्थापक राकेश देशमुख यांनी केले आहे.

पहा: इंडस प्रणालीची तोंडओळख करून देणारा व्हिडीओ.

Web Title: speech to text feature on Indus Key Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.