आयव्हुमीचा फेसियल रिकग्नीशन फिचरयुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: March 13, 2018 07:46 PM2018-03-13T19:46:25+5:302018-03-13T20:16:58+5:30

आयव्हुमी कंपनीने फेसियल रिकग्नीशन फिचरने सज्ज असणारा आयव्हुमी आय१एस अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

Smartphones with a face recognition feature of iWuMi | आयव्हुमीचा फेसियल रिकग्नीशन फिचरयुक्त स्मार्टफोन

आयव्हुमीचा फेसियल रिकग्नीशन फिचरयुक्त स्मार्टफोन

आयव्हुमी कंपनीने फेसियल रिकग्नीशन फिचरने सज्ज असणारा आयव्हुमी आय१एस अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

आयव्हुमी या कंपनीने गेल्या वर्षी आय१एस हा स्मार्टफोन लाँच केला होता. याच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून आयव्हुमीने आपल्या या स्मार्टफोनची अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन बाजारपेठेत उतारली आहे. यात मूळ मॉडेलपेक्षा काही अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात सर्वात लक्षणीय म्हणजे फेसियल रिकग्नीशनची सुविधा होय. नावातच नमूद असल्यानुसार या फिचरच्या अंतर्गत फ्रंट कॅमेर्‍याच्या मदतीने चेहर्‍याच्या मदतीने स्मार्टफोन अनलॉक करता येतो. यासोबत कंपनीने दोन वर्षांची वॉरंटी देण्याचे जाहीर केले आहे. रिलायन्सच्या जिओ फुटबॉल ऑफरच्या अंतर्गत या स्मार्टफोनसाठी २,२०० रूपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. यामुळे मूळ ७,४९९ रूपये मूल्य असणार्‍या हा स्मार्टफोन ग्राहकांना प्रत्यक्षात ५,२९९ रूपयात खरेदी करता येणार आहे.

आयव्हुमी आय१एस अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन या मॉडेलमध्ये इन्फीनिटी एज या प्रकारातील, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा ५.४५ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी६७३७व्ही हा प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशयुक्त १३ व २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून याच्या मदतीने उत्तम प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात फोरजी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह कनेक्टीव्हिटीचे अन्य पर्याय दिले आहेत.

Web Title: Smartphones with a face recognition feature of iWuMi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.