धक्कादायक...अॅलेक्साद्वारे पोपटाने केले ऑनलाईन शॉपिंग; शिवी देण्यावरून आहे बदनाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:54 PM2018-12-18T15:54:06+5:302018-12-18T15:55:28+5:30

आवाज देऊन अॅलेक्सा या उपकरणाला सूचना देऊन इंटरनेटच्या सहाय्याने अनेक कामे करता येतात. मात्र, याच अॅलेक्साद्वारे एखादा दुरुपयोगही करू शकतो.

Shocking ... Parrot did Online Shopping on Alexa; using abusive words | धक्कादायक...अॅलेक्साद्वारे पोपटाने केले ऑनलाईन शॉपिंग; शिवी देण्यावरून आहे बदनाम

धक्कादायक...अॅलेक्साद्वारे पोपटाने केले ऑनलाईन शॉपिंग; शिवी देण्यावरून आहे बदनाम

Next

ब्रिटन : आवाज देऊन अॅलेक्सा या उपकरणाला सूचना देऊन इंटरनेटच्या सहाय्याने अनेक कामे करता येतात. मात्र, याच अॅलेक्साद्वारे एखादा दुरुपयोगही करू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे एका पोपटाने अॅलेक्साला सूचना देत अॅमेझॉनवरून टरबूज, स्ट्रॉबेरी आणि आईसक्रीम सारख्य़ा वस्तू मागवल्या. मालकिनीला जेव्हा या कृत्याबाबत समजले तेव्हा तिने या ऑर्डर रद्द करून टाकल्या. 

हा पोपट ऑफ्रिकन ग्रे प्रजातीचा आहे. त्याचे नाव रोको आहे. रोको या आधीही त्याच्या कृत्यांमुळे बदनाम आहे. तो आधी एका म्युझिअममध्ये होता. मात्र, तेथे येणाऱ्यांना शिव्या घालत असल्याने तेथे काम करणाऱ्या मॅरियन विश्चन्येस्की यांनी त्याला घरी आणले. तो जेव्हा एकटा असतो, तेव्हा अॅलेक्सासोबत बोलत असतो. 

या दरम्यान, रोकोने अॅलेक्साला सूचना करत ऑनलाईन शॉपिंग साईट अॅमेझॉनवरून आइस्क्रीम, किशमिश, तरबूज, स्ट्रॉबेरीज़, ब्रॉकली या सारख्या पदार्थांची ऑर्डर दिली होती. याशिवाय एक पतंग, बल्ब आणि किटलीही मागविली. मात्र, पॅरेंटल लॉक असल्याने अॅमेझॉनला पैसे जाऊ न शकल्याने हे सामान कार्टमध्येच राहिले. 

घरी आल्यावर याबाबतचे नोटिफिकेशन मॅरियन यांनी मिळाले आणि त्यांना धक्काच बसला. एवढे सामान कार्टमध्ये पाहून त्यांनी ते तातडीने रद्द केले. त्यांनी सांगितले की, रोको सारखा अॅलेक्साशी बोलत असतो. आणि बऱ्याचदा गाण्याची मागणीही करतो. 

Web Title: Shocking ... Parrot did Online Shopping on Alexa; using abusive words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.