शाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात

By शेखर पाटील | Published: January 4, 2018 10:54 AM2018-01-04T10:54:49+5:302018-01-04T11:12:24+5:30

शाओमी कंपनीने आपल्या मी मिक्स २ या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची कपात जाहीर केली आहे.

Shawmi I cut the Mix 2 value | शाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात

शाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात

googlenewsNext

शाओमी कंपनीने आपल्या मी मिक्स २ या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची कपात जाहीर केली आहे. शाओमी कंपनीने गेल्या ऑक्टोबर महिन्यात मी मिक्स २ हे उच्च श्रेणीतील मॉडेल ३५,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना फ्लिपकार्टवरून सादर केले होते. आता यात ३ हजारांची कपात करण्यात आली असून ते ३२,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. ही सवलत प्रारंभ फक्त ऑफलाईन युजर्ससाठी प्रदान करण्यात आल्याचे मानले जात होते. मात्र फ्लिपकार्टवरही सध्या याच दरात हे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहे.
 
शाओमी मी मिक्स २ स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि २१६० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा आणि १८:९ गुणोत्तर असणारा सुपर अमोलेड फुल स्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. यात ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर आहे. शाओमी मी मिक्स २ मधील मागच्या बाजूला १२ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. तर यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात फोरजी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानासह यात ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

शाओमी मी मिक्स २ हे मॉडेल सहा जीबी रॅम आणि ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या तीन पर्यायांमध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र यातील ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.  

Web Title: Shawmi I cut the Mix 2 value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.