मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

By शेखर पाटील | Published: December 18, 2017 12:26 PM2017-12-18T12:26:53+5:302017-12-18T12:30:17+5:30

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Samsung's two new flagship smartphones to be presented at the Mobile World Congress | मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

Next

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात लास-वेगास येथे आयोजित करण्यात येणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो म्हणजेच सीईएसमध्ये बहुतांश कंपन्या आपापल्या नवीन उपकरणांचे अनावरण करत असतात. या अनुषंगाने सॅमसंग कंपनीतर्फे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स सीईएसमध्ये सादर करण्यात येतील, अशी माहिती अलीकडेच लीक झाली होती.

यातून या आगामी मॉडेल्सचे फीचर्सदेखील जगासमोर आले होते. तथापि, दक्षिण कोरियातून आलेल्या नवीन विश्‍वासार्ह सूत्रांनुसार सॅमसंग कंपनी सीईएसऐवजी बार्सीलोना शहरात फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. अ‍ॅपल आणि सॅमसंग कंपनीत नेहमी रस्सीखेच सुरू असते. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आयफोन-एक्स मॉडेलला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता सॅमसंगने याला टक्कर देण्यासाठी गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन स्मार्टफोन्स बाजारपेठेत उतारण्याची तयारी केल्याचे मानले जात आहे.

सॅमसंग कंपनीला आपल्या गॅलेक्सी नोट ७ च्या अपयशामुळे मोठा धक्का बसला होता. यामुळे या कंपनीच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह लागले होते. यानंतर मात्र गॅलेक्सी एस८ आणि गॅलेक्सी एस८ प्लस या मॉडेल्सच्या यशामुळे कंपनीची गाडी पुन्हा रूळावर आली आहे. याचीच पुढील आवृत्ती असणार्‍या गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या दोन्ही मॉडेल्सकडूनही कंपनीला खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, आजवर विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आलेल्या फीचर्सनुसार गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या मॉडेल्समध्ये अनुक्रमे ५.६ अथवा ५.७ आणि ६.१ इंच आकारमानांचे सुपर अमोलेड इन्फीनिटी डिस्प्ले असतील. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा नवीन प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. यात ६ जीबीपर्यंत रॅम तर १२८ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय असतील. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असून हे मॉडेल्स अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत प्रणालींवर चालणारे असतील अशी शक्यता आहे.
( गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लसचे लीक्सच्या माध्यमातून समोर आलेले छायाचित्र)
 

Web Title: Samsung's two new flagship smartphones to be presented at the Mobile World Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.