Samsung's Galaxy J2 Pro, Galaxy J7 Nxt or Galaxy J7 Max Vodafone's Cashback Offer on the Smartphone | सॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर
सॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर

ठळक मुद्देव्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णयसॅमसंग गॅलेक्सी जे 2 प्रो, गॅलेक्सी जे 7 किंवा गॅलक्सी जे 7 मॅक्स या स्मार्टफोनवर कॅशबॅक मिळणारव्होडाफोनकडून 1500 रुपयांची कॅशबॅक, या महिन्यात लॉंच करण्यात येणार  

मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची कंपनी असलेल्या व्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्टनरशिपमुळे सॅमसंगने आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे.  या ऑफरच्या माध्यमातून सॅमसंग 4जी स्मार्टफोनवर कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे 2 प्रो, गॅलेक्सी जे 7 किंवा गॅलक्सी जे 7 मॅक्स या स्मार्टफोनवर व्होडाफोनकडून 1500 रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर या महिन्यात लॉंच करण्यात येणार आहे.  
सॅमसंग गॅलक्सी जे 2 प्रो, गॅलक्सी जे 7 नेक्स्ट किंवा गॅलक्सी जे 7 मॅक्स खरेदी केला असल्यास 24 महिने सातत्याने 198 रूपयांचा रिचार्ज करा. यात तुम्हाला 28 दिवसांसाठी रोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळू शकणार आहे. तसेच, पोस्टपेड युजर्संना व्होडाफोनचा रेड प्लॅन घ्यावा लागणार आहे. यामध्ये 12 महिन्यांनंतर 600 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि नंतर 24 महिन्यानंतर 900 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. दरम्यान, ही कॅशबॅक व्होडाफोनच्या एम पैसा वॉलेटमध्ये जमा होणार आहे. 
सॅमसंग गॅलक्सी जे 5 प्रो या स्मार्टफोनची किंमत 8,490 रुपये आहे.  त्यामुळे या कॅशबॅक ऑफरमध्ये ही किंमत 6,990 रुपये इतकी होणार आहे. तसेच, सॅमसंग गॅलक्सी जे 7 नेक्स्ट आणि सॅमसंग गॅलक्सी जे 7 मॅक्सची किंमत अनुक्रमे 10,490 आणि 16,900 रुपये आहे. परंतू या कॅशबॅकमुळे ही किंमत अनुक्रमे 8,990 रुपये आणि 15,400 रुपये असणार आहे. 


Web Title: Samsung's Galaxy J2 Pro, Galaxy J7 Nxt or Galaxy J7 Max Vodafone's Cashback Offer on the Smartphone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.