सॅमसंगने आपल्याच ब्रँड अॅम्बॅसिडरला आकारला 12 कोटींचा दंड; कारणही क्षुल्लकच...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:58 AM2018-10-29T10:58:00+5:302018-10-29T10:59:04+5:30

रशियाची 36 वर्षांची अभिनेत्री सेनिया सोबचक रशियामध्ये सॅमसंगची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे.

Samsung imposes penalty of 12 crores on its own brand ambassador | सॅमसंगने आपल्याच ब्रँड अॅम्बॅसिडरला आकारला 12 कोटींचा दंड; कारणही क्षुल्लकच...

सॅमसंगने आपल्याच ब्रँड अॅम्बॅसिडरला आकारला 12 कोटींचा दंड; कारणही क्षुल्लकच...

googlenewsNext

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील दिग्गज कंपनी सॅमसंगनेरशियातील आपल्याच ब्रँड अॅम्बॅसिडरला 12 कोटींचा दंड आकारला आहे. कारण फक्त एवढेच आहे की त्या सेलिब्रेटीने एका टीव्ही इंटरव्ह्यूवेळी सॅमसंगऐवजी अॅपलचा फोन वापरला.


रशियाची 36 वर्षांची अभिनेत्री सेनिया सोबचक रशियामध्ये सॅमसंगची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. करारामध्ये सार्वजनिक ठिकाणी सॅमसंगचाच मोबाईल वापरण्याचा उल्लेख आहे. सेनिया ही रशियातील प्रसिद्ध डान्सर. टीव्ही अँकर, पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातली मोठी हस्ती आहे. 


नुकत्याच झालेल्या एका टीव्ही मुलाखतीमध्ये सेनियाकडून छोटीशी चूक झाली. नेहमी ती आयफोनचा वापर करते. यामुळे मुलाखतीवेळीही ती आयफोनच घेऊन गेली आणि सॅमसंगच्या रडारवर आली. आपण आयफोन आणल्याचे तिच्या लक्षात आले म्हणून तिने फोन कागदाने लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला पाहणाऱ्यांमधील एका चाणाक्ष नजरेने तिला हेरले आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. 


ही बाब सॅमसंगच्या लक्षात आल्यावर कंपनीने सेनियावर करारामधील अटी तोडल्याबद्दल खटला दाखल केला आणि 12 कोटींचा दंडही आकारला आहे. 


सेनिया ही मागील निवडणुकीमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात निवडणूक लढवत होती. रशियाच्या अध्यक्षपदासाठी लढणारी ती सर्वात तरुण उमेदवार होती.
 

Web Title: Samsung imposes penalty of 12 crores on its own brand ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.