सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह 2ची घोषणा

By शेखर पाटील | Published: October 19, 2017 12:29 PM2017-10-19T12:29:42+5:302017-10-19T12:29:51+5:30

सॅमसंग कंपनीने आपला सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ हा टॅबलेट जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून हा रफ वापरण्यासाठी उपयुक्त आहे.

Samsung Galaxy Tab Aventive 2 announced | सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह 2ची घोषणा

सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह 2ची घोषणा

Next

खरं तर टॅबलेट म्हटला की, तो वापरण्यासाठी जितका सुलभ तितकाच नाजूकदेखील असतो. मात्र अनेकदा अत्यंत विषम वातावरणात टॅबलेट वापरण्याची गरज भासते. यावेळी बाजारपेठेत उपलब्ध असणारी बहुतांश मॉडेल्स कुजकामी ठरतात. नेमक्या याच वेळी रफ वापरण्यासाठी सक्षम असणार्‍या टॅबलेटची आवश्यकता भासते. ही गरज लक्षात घेत अलीकडच्या काळात रफ वापरासाठी खास मॉडेल्स लाँच होत आहेत. यात आता सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ या टॅबलेटची भर पडली आहे. यात लष्करातील उपकरणांच्या तोडीचे आणि एमआयएल-एससटीडी ८१०जी या मानकाचे निकष पूर्ण करण्यात आले आहेत. यासोबत याला आयपी६८ प्रमाणपत्र असून हा टॅबलेट वॉटरप्रूफ असेल. तसेच तो डस्टप्रूफही असून अगदी हातमोजे (ग्लोव्हज) घातलेले असतांनाचही याचा टचस्क्रीन डिस्प्ले वापरता येणार असल्याचा सॅमसंग कंपनीने दावा केला आहे. याला सॅमसंगच्या एस पेनचा सपोर्ट दिलेला आहे. याच्या मदतीने या टॅबलेटवर रेखांकन करण्यासह नोटस् काढणे शक्य आहे. तर यात सॅमसंग कंपनीने विकसित केलेला बिक्सबी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटदेखील देण्यात आला आहे. याचा उपयोग करून व्हाईस कमांडच्या मदतीने कुणीही विविध फंक्शन्सचा वापर करू शकेल. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे. तर यातील ४५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीमध्ये रिव्हर्स चार्जींगची सुविधा असेल. अर्थात याच्या मदतीने अन्य उपकरणे चार्ज करता येतील.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ या मॉडेलमध्ये आठ इंच आकारमानाचा १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८८० प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ती मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर आधारित असणार्‍या टचविझ या प्रणालीवर चालणारा असेल. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्ल्यु-टुथ व युएसबी टाईप-सी पोर्ट या सुविधा असतील. तर याचे सेल्युलर कनेक्टिव्हिटी असणारे मॉडेल लवकरच लाँच करण्यात येईल असे कंपनीने नमूद केले आहे. युरोपात हे मॉडेल ५०० युरो (सुमारे ३९,००० रूपये) इतक्या मूल्यात लाँच करण्यात आले आहे. भारतात लवकरच ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Samsung Galaxy Tab Aventive 2 announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.