सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: July 6, 2018 10:14 AM2018-07-06T10:14:20+5:302018-07-06T10:14:36+5:30

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन ६ हा मिड- रेंजमधील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

Samsung Galaxy launches on 6 market | सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ बाजारपेठेत दाखल

सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ बाजारपेठेत दाखल

googlenewsNext

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन ६ हा मिड- रेंजमधील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ या स्मार्टफोनचे मूल्य १४४९० रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ब्लॅक आणि ब्ल्यू या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देण्यात आलेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ या मॉडेलमध्ये इन्फीनिटी या प्रकारातील डिस्प्ले दिला आहे. हा सुपर अमोलेड डिस्प्ले ५.६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आहे.  याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असा असून यावर २.५डी वक्राकार ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८७० हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात ब्युटी, अ‍ॅनिमेटेड जीआयएफ, अ‍ॅक्शन, पॅनोरामा, फूड, एचडीआर आदी विविध मोड प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यामध्ये चॅट ओव्हर व्हिडीओ हे विशेष फिचर दिलेले आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनवर व्हिडीओ सुरू  असतांनाही कोणत्याही मॅसेजला उत्तर देता येणार आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

Web Title: Samsung Galaxy launches on 6 market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.