Samsung Galaxy J7 Max and J7 Pro gets cheap! | सॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त !
सॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त !

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ मॅक्स आणि जे७ प्रो या स्मार्टफोन्सच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे.

वाढीव स्पर्धेला तोंड देण्यासाठी बहुतांश कंपन्या आपल्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात कपात करत असतात. या अनुषंगाने आता सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ मॅक्स व जे७ प्रो या दोन मॉडेल्सच्या मूल्यात कपात करण्याचे जाहीर केले आहे. हे दोन्ही मॉडेल्स गेल्या वर्षीच्या जून महिन्यात ग्राहकांना अनुक्रमे १७,९०० आणि २०,९०० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले होते. यात ३ आणि २ हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. अर्थात आता सॅमसंग गॅलेक्सी जे७ मॅक्स हा स्मार्टफोन १४,९०० आणि जे७ प्रो हे मॉडेल १८,९०० रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. मूल्यातील ही कपात ऑफलाईन विक्रीसाठी करण्यात आली असून फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टल्सवरही हे स्मार्टफोन्स सवलतीच्या दरात मिळत आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी जे७ प्रो या मॉडेलमध्ये अल्वेज-ऑन या प्रकारातील ५.५ इंची फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला आहे. तर यातील बॅटरी ३६०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी जे७ मॅक्स या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले दिला आहे. याची रॅम ४ जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातही रिअर आणि फ्रंट कॅमेरे प्रत्येकी १३ मेगापिक्सल्सचे असून यातील बॅटरी ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.


Web Title: Samsung Galaxy J7 Max and J7 Pro gets cheap!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.