फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलवर 'रिपब्लिक डे सेल'

By शेखर पाटील | Published: January 17, 2018 02:14 PM2018-01-17T14:14:12+5:302018-01-17T14:17:05+5:30

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने 'रिपब्लीक डे सेल'ची घोषणा केली असून यात विविध प्रॉडक्टवर अतिशय आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 

'Republic Day Sale' on Flipkart Shopping Portal | फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलवर 'रिपब्लिक डे सेल'

फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलवर 'रिपब्लिक डे सेल'

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने 'रिपब्लीक डे सेल'ची घोषणा केली असून यात विविध प्रॉडक्टवर अतिशय आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.  अमेझॉनने नुकतीच ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली आहे. याला आव्हान देण्यासाठी फ्लिपकार्ट हे शॉपींग पोर्टलदेखील सरसावले असून त्यांच्यातर्फे 'रिपब्लीक डे सेल' जाहीर करण्यात आला आहे. हा सेल २१ ते २३ जानेवारीच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सेलच्या दरम्यान फ्लिपकार्ट पोर्टलतर्फे स्मार्टफोन, लॅपटॉप, टिव्ही आदींसह अन्य उपकरणांवर अतिशय आकर्षक असे डिस्काऊंट प्रदान करण्यात येणार आहेत. यात सिटीबँकचे क्रेडिट वा डेबिट कार्डचा वापर करणार्‍यांना १० टक्के सवलत मिळणार आहे. फ्लिपकार्ट पोर्टलतर्फे ग्राहकांना आतापासूनच विशलिस्ट तयार करण्याचे सूचित करण्यात आले असून या प्रॉडक्टवर जाहीर केलेल्या ऑफर्सशिवाय विशेष सवलत मिळणार आहे हे विशेष.

स्मार्टफोनचा विचार केला असता अनेक मॉडेल्स हे सवलतीत मिळणार आहेत. यात गुगलचा पिक्सेल २ एक्सएल हा स्मार्टफोन ४८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तर एचडीएफसी क्रेडिट कार्डचा वापर करणार्‍यांना अतिरिक्त १० टक्के सवलत मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी एस७ हे मॉडेल अवघ्या २६,९९० रूपयात (मूळ मूल्य ४६,०००) मिळेल. तर शाओमीचा मी मिक्स २ हा स्मार्टफोन २९,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर मिड रेंजमधील शाओमी रेडमी नोट ४ (४जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज); लेनोव्हो के८ प्लस, मोटो जी५ प्लस; सॅमसंग गॅलेक्सी ऑन नेक्स्ट (६४ जीबी व्हेरियंट); इन्फीनिक्स झीरो फोर; पॅनासोनिक एल्युगा ए३ आदी स्मार्टफोनही सवलतीच्या दरात मिळतील.

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने अद्याप टिव्ही, लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नेमका किती डिस्काऊंट मिळेल याची माहिती जाहीर केलेली नाही. तथापि, या उत्पादनांवरही आकर्षक ऑफर्स मिळतील असे मानले जात आहे. अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच्या कालखंडात फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या शॉपींग पोर्टल्समध्ये जोरदार चुरस निर्माण होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Web Title: 'Republic Day Sale' on Flipkart Shopping Portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.