फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय 7

By शेखर पाटील | Published: April 23, 2018 02:03 PM2018-04-23T14:03:45+5:302018-04-23T14:04:04+5:30

पॅनासोनिक कंपनीने एल्युगा आय ७ हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध केला आहे.

Panasonic Eluga I7 will be available from Flipkart | फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय 7

फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय 7

googlenewsNext

पॅनासोनिक कंपनीने एल्युगा आय ७ हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध केला आहे. पॅनासोनिक एल्युगा आय ७ हे मॉडेल ग्राहकांना ६,४९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले असून उद्यापासून फ्लिपकार्टवरून उपलब्ध होणार आहे. निळा, काळा आणि सोनेरी या रंगाच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. यामध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा व बिग व्ह्यू या प्रकारातील आयपीएस डिस्प्ले देण्यात आला असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यामध्ये मीडियाटेकचा एमटी ६७३७ हा प्रोसेसर दिलेला आहे. या मॉडेलची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये पॅनासोनिक कंपनीने विकसित केलेल्या अर्बो हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट देण्यात आलेला आहे. यावर आधारित अर्बो हबची सुविधा ग्राहकाला अपडेटच्या स्वरूपात मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यामध्ये एलईडी फ्लॅशसह मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ८ मेगापिक्सल्स क्षमतेचे देण्यात आले आहेत.

पॅनासोनिक एल्युगा आय ७ या स्मार्टफोनमध्ये तब्बल ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळाचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यामध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनरसह यामध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

Web Title: Panasonic Eluga I7 will be available from Flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.