ऑर्कुट पुन्हा सोशल मीडियाच्या मैदानात, फेसबुकला देणार का टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:29 PM2018-04-12T21:29:37+5:302018-04-12T21:29:37+5:30

'Hello', सोशल नेटवर्किंगमध्ये ऑर्कुटचे पुन्हा लॉग इन

Orkut founder to launch 'Hello' social network app in India | ऑर्कुट पुन्हा सोशल मीडियाच्या मैदानात, फेसबुकला देणार का टक्कर

ऑर्कुट पुन्हा सोशल मीडियाच्या मैदानात, फेसबुकला देणार का टक्कर

Next

नवी दिल्ली - एकेकाळी सोशल मीडियावर गाजलेली ऑर्कुट ही वेबसाईटने पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये एन्ट्री केला आहे. फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडल्यामुळं चार वर्षापूर्वी नेटीझन्सना अलविदा केला होता.  आता पुन्हा नव्या आयडिया घेऊन पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या मैदानात आलं आहे. त्यामुळं फेसबुकला टक्कर देणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. ऑर्कुटचे नाव आता हॅलो असे करण्यात आलं आहे. 42 वर्षीय बुयुकोकटेन यांनी याबाबतची माहिती दिली. 

डेटा लीक प्रकरणामुळं अनेकांनी फेसबुकमधून लॉग आऊट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा ऑर्कुटला होण्याची शक्यता आहे. अत्यंत योग्य वेळेत ‘हॅलो’ लाँच केल्यानं भारतीय ग्राहकांकडूनही याला चांगला प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 14 वर्षांपूर्वी गुगलने ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट आणून इंटरनेट विश्वात नवी क्रांती घडवली होती. अल्पावधीत ऑर्कुट जगभरात लोकप्रिय झाले होते, मात्र फेसबुक, ट्विटर यासारख्या साईट्सने ऑर्कुटला मागे टाकले. 2011 मध्ये गुगलने गुगल प्लस ही नवी सोशल नेटवर्किंग सुविधा सुरु केली त्यावेळीच ऑर्कुट बंद होणार असे संकेत देण्यात आले होते.  

दशकापूर्वी ऑर्कुट वापरणार्‍यांचे प्रमाण जगात 300 कोटी इतके होते. त्यानंतर 2004 मध्ये फेसबुक आले आणि त्याने ऑर्कुटला मागे टाकले. फेसबुकचे सध्या दरमहा 200 कोटीहून अधिक ऍक्टीव्ह युजर्स असतात. ज्याप्रमाणे ऑर्कुटने सोशल मीडियामध्ये आपले स्थान निर्माण केले त्याचप्रमाणे हॅलो’ही कमी कालावधीत लोकप्रिय होईल असा विश्वास बुयुकोकटेन यांनी व्यक्त केला. 

Web Title: Orkut founder to launch 'Hello' social network app in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.