... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:43 PM2018-12-08T16:43:33+5:302018-12-08T16:47:56+5:30

असे म्हणतात की, जब ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ कर देता है. असाच अनुभव दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणाला आला आहे. शेखर असे या तरुणाचे नाव आहे.

oneplus lucky star shekhar got 600 gifts from oneplus and amazon india | ... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स

... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स

Next

नवी दिल्ली : असे म्हणतात की, जब ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ कर देता है. असाच अनुभव दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणाला आला आहे. शेखर असे या तरुणाचे नाव आहे. त्याला असे कधी वाटले नव्हते की, एक स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्याबदल्यात स्मार्टफोनसोबत जवळपास 600 गिफ्ट्स भेटतील. या गिफ्ट्सची किंमत 80, 000 रुपयांपर्यंत आहे.  

दरम्यान, वनप्लस आणि अॅमेझॉन यांनी संयुक्तरित्या एक प्रमोशनल कॅम्पेन 'वनप्लस लकी स्टार'चे आयोजन केले होते. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या भागेदारीला चार वर्षे पूर्ण झाली होती, म्हणून हे कॅम्पेन सुरु केले होते. या कॅम्पेनमध्ये OnePlus 6T स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी एकाला लकी स्टार म्हणून निवडले जाणार असून लकी स्टारला स्मार्टफोनसह 600 गिफ्ट्स देण्यात येणार, असे घोषित करण्यात आले होते.   

या कॅम्पेनमध्ये शेखर हा लकी स्टार ठरला आणि त्याला स्मार्टफोनसह 600 गिफ्ट्स देण्यात आली आहेत. यामध्ये फर्नीचर, अप्लायन्सेस, गॅजेट्स, फॅशन एक्सेसिरीज, फ्रीज, लॅपटॉप, किचनमधील वस्तू अशा स्वरुपाचे अनेक गिफ्ट्स ट्रकमधून त्याच्या घरी आले आहेत. विशेष म्हणजे, OnePlus 6T स्मार्टफोन शेखरला देण्यासाठी वनप्लस इंडियाचे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल दिल्लीत आले होते. 

दरम्यान, गेल्या 12 डिसेंबरला कंपनी OnePlus 6T स्मार्टफोनचा नवीन व्हेरियंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचे नाव OnePlus 6T McLaren असे असेल. तसेच, यामध्ये 10 जीबी रॅम आणि एक नवीन कलर थीम असणार असल्याचे समजते. 
 

Web Title: oneplus lucky star shekhar got 600 gifts from oneplus and amazon india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.