नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या वनप्लसनं दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. वनप्लस 7 प्रोला लाँच केलं असून, त्यात 8 कोअरचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855चा नॅनोमीटर चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस 7 प्रो या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅमची सुविधा आहे. रॅमची मेमरी वाढवल्यामुळे आता आपल्याला हेवीवेट गेमही या स्मार्टफोनमध्ये खेळता येणार आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनच्या परफॉर्मन्समध्येही सुधारणा झाली आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 3700mAhहून वाढवून 4000mAh करण्यात आली आहे. फोनमध्ये डोल्बी एटमॉसचे थ्रीडी साऊंडचे ड्युअल स्पीकरही बसवण्यात आले आहेत. वनप्लस 7 प्रोमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात यूएफएस 3.0 स्टोरेज आणि जलद चार्जिंग होण्याची व्यवस्थाही केली आहे. OnePlus 7चे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. वनप्लस या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आकर्षक फीचर्स असले तरी लोकांच्या नजरा या OnePlus 7 Pro खिळल्या आहेत.


वनप्लस 7मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये मोठी बॅटरी, 30 वॅटचा चार्जर असणार आहे. तर वनप्लस 7 प्रोमध्ये अल्ट्रावाईड कॅमेरा लेन्स, पावरफूल बॅटरी, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 12 जीबीची रॅम असणार आहे. वनप्लसचे फोन कॅमेरासाठी ओळखले जातात.यामुळे या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सोनीचा IMX586 सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेकंडरी कॅमेराद्वारे टेलिफोटो शूटर दिला आहे. तिसरा कॅमेरा केवळ वनप्लस 7 प्रो मध्येच असेल. यामध्ये वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. 

वनप्लस 7 प्रो चे व्हेरिअंट और कीमत (अंदाजे)
6GB रॅम + 128GB स्टोरेज : 49,999 रुपए
8GB रॅम + 256GB स्टोरेज : 52,999 रुपए
12GB रॅम + 256GB स्टोरेज : 57,999 रुपए


Web Title: OnePlus 7 Pro Launches NewPlus Smartphone, Learn Features and Pricing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.