आता उत्सुकता 'वन प्लस ५ टी'च्या आगमनाची !

By शेखर पाटील on Thu, November 09, 2017 1:16pm

वन प्लस कंपनीचे वन प्लस ५ टी या फ्लॅगशीप मॉडेलला १६ नोव्हेंबर रोजी ग्लोबल लाँच कार्यक्रमात सादर केले जाणार असून याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.

१६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वन प्लस ५ टी या मॉडेलचे अनावरण होणार असल्याचे या कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तर भारतात २१ नोव्हेंबरपासून भारतात हा स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडिया तसेच वन प्लस कंपनीच्या भारतीय पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. तर नंतरच्या टप्प्यात हे मॉडेल ऑफलाईन पध्दतीतही सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे. वन प्लस कंपनीने किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्स असणारे स्मार्टफोन सादर करण्याचा पायंडा पाडला आहे. या अनुषंगाने वन प्लस ५ टी हे मॉडेलदेखील फारसे महागडे नसेल असे मानले जात आहे. यातच या कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी वन प्लस ५ टी चे मूळ व्हेरियंट ३४९९ चीनी युऑन म्हणजेच सुमारे ३४,२०० रूपये इतके असेल असे आधीच जाहीर केले आहे. हा स्मार्टफोन ६जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज तसेच ८जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.

वन प्लस ५ टी या स्मार्टफोनमधील फिचर्सचे अनेक लीक्स समोर आले आहेत. यानुसार यात ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले एज-टू-एज या प्रकारातील असून याचा अस्पेक्ट रेशो १८:९ इतका असेल. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता असून याच्या मेगापिक्सल्सची माहिती मात्र समोर आलेली नाही. तर यात ३४५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीवर आधारित ऑक्सीजन ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा असू शकतो. वन प्लसने भारतात जोरदार आगमन केले असले तरी अलीकडच्या काळात शाओमीने मारलेल्या मुसंडीप्रमाणे या कंपनीला आगेकूच करता आलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, वन प्लस ५ टी या मॉडेलच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

संबंधित

‘स्मार्ट फोन’ला ठेकेदारांची ना-ना
स्मार्टफोनने व्हा 'स्मार्ट'
चक्क सह-संस्थापकाला मेल करून वन प्लस ५टी मागितला गिफ्ट म्हणून   
ऑनर 8 लाईट झाला स्वस्त : जाणून घ्या मूल्य आणि फीचर्स
नोकिया 2 स्मार्टफोन आजपासून मिळणार

तंत्रज्ञान कडून आणखी

वाढीव स्टोअरेजसह मिळणार कुलपॅड नोट ५ लाईट
एचपीच्या गेमिंग लॅपटॉपची मालिका
गार्मिनचे विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉच
हा आहे 26 लाखांचा iPhone X, पाहा काय आहे या फोनमध्ये खास?
अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप 

आणखी वाचा