व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 02:24 PM2018-09-18T14:24:40+5:302018-09-18T14:25:39+5:30

आम्ही तुम्हाला अशा अॅपबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फोनवर आलेले मॅसेज, नोटिफिकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर देते.

not only Whatsapp, can see Other Notifications on the Desktop | व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर

व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर

Next

व्हॉट्सअॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र, इतर मॅसेज, अॅपची नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी फोनवर वारंवार जावेच लागत होते. आम्ही तुम्हाला अशा अॅपबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फोनवर आलेले मॅसेज, नोटिफिकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर देते.


पुश बुलेट असे या अॅपचे नाव असून ते अवघ्या 3.5 एमबीचे आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आणखी एक सेटिंग डेस्कटॉपवर करावी लागणार आहे. पुश बुलेट अॅप डाऊनलोड केले की त्यावर फेसबुक किंवा गुगल अकाऊंटद्वारे जोडण्यासाठी विचारले जाते. तेथे लॉग इन केल्यावर डेस्कटॉपवर जाऊन तेथील ब्राऊजरवर पुश बुलेटचे एक्सटेंशन अॅड करावे लागणार आहे. यानंतर या एक्टेंशनमध्ये जे मोबाईलच्या अॅपमध्ये लॉगिन आहे त्या अकाऊंटसारखेच लॉगइन करावे लागणार आहे. 


या अकाऊंटमध्ये लॉग इन केल्यानंतर ब्राऊजरवर उजव्या कोपऱ्यामध्ये एक बुलेटच्या आकाराचा सिम्बॉल दिसतो. यावर तुम्हाला आलेली नोटीफिकेशन समजतात. तसेच एखादा मॅसेज आला तर त्याला रिप्लाय देण्यासाठी नवी छोटी चॅट विंडोही उघडते. 


या फिचरसोबत तुम्ही तुमच्या फाईलही कॉम्प्युटरला पाठवू शकता. याशिवाय मित्रांसोबतही चॅट करता येतो.

Web Title: not only Whatsapp, can see Other Notifications on the Desktop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.