नोकियाचा प्रिमिअम स्मार्टफोन लाँच; 12 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासह ड्युअल फ्लॅशही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 11:04 AM2018-12-06T11:04:03+5:302018-12-07T18:03:49+5:30

Nokia 8.1 या फोनचे डिझाईन नुकत्याच भारतात लाँच झालेल्या Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus सोबत मिळतेजुळते आहे.

Nokia's premium smartphone Nokia 8.1 launched with Camera with 12 megapixel with dual flash | नोकियाचा प्रिमिअम स्मार्टफोन लाँच; 12 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासह ड्युअल फ्लॅशही

नोकियाचा प्रिमिअम स्मार्टफोन लाँच; 12 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासह ड्युअल फ्लॅशही

Next

नवी दिल्ली : एकेकाळी जगभरातील मोबाईल प्रेमींवर राज्य गाजविणारी HMD Global काही वर्षांपूर्वी फार रसातळाला गेली होती. आता पुन्हा ही कंपनी कात टाकत असून अँड्रॉईड ओएसवर चालणारे एकापेक्षा एक फोन लाँच करत आहे. HMD Global बुधवारी रात्री दुबईतील एका कार्यक्रमात Nokia 8.1 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला. महत्वाचे म्हणजे चीनमध्ये हाच फोन Nokia X7 या नावाने ऑक्टोबरमध्येच लाँच करण्यात आला होता. 


Nokia 8.1 या फोनचे डिझाईन नुकत्याच भारतात लाँच झालेल्या Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus सोबत मिळतेजुळते आहे. Nokia 8.1 हा फोन प्रिमिअम श्रेणीमध्ये लाँच करण्यात आला असल्याने काही फिचर्स हे जादा असणार आहेत. 


या फोनची किंमत EUR 399 (31999 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन युरोप आणि आखाती देशांमध्ये डिसेंबरच्या मध्यावर सेलद्वारे उपलब्ध होईल. तर भारतात हा फोन 10 डिसेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात आणखी काही फोन कंपनी लाँच करू शकते. 


Nokia 8.1 हा फोन पाच रंगांमध्ये उपलब्ध होईल. ब्ल्यू, सिल्व्हर, स्टील, कॉपर आणि आयर्न हे रंग असणार आहेत. डिस्प्लेमध्ये मॉच फिचर देण्यात आले आहे. androidone चा स्मार्टफोन असल्याने यामध्ये Android 9 Pie ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. 6.18 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय स्क्रीन रिझोल्यूशन 1080x2244 पिक्सल आहे. 


फोनमध्ये Qualcomm स्नैपड्रेगन 710 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे 400 जीबी पर्यंत स्टोरेज वाढविता येऊ शकते. फोनमध्ये 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

कॅमेरा 
Nokia 8.1 मध्ये Zeiss च्या लेन्सचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर 1.4 मायक्रॉन पिक्सलसह देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तसेच पाठीमागे ड्युअल LED फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
 

Web Title: Nokia's premium smartphone Nokia 8.1 launched with Camera with 12 megapixel with dual flash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.