मॅकओएस प्रणालीची नवीन आवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:51 PM2018-06-05T15:51:51+5:302018-06-05T15:51:51+5:30

अ‍ॅपल कंपनीने आपल्या मॅकओएस या ऑपरेटींग सिस्टीमची मोजावे या नावाने नवीन आवृत्ती सादर केली असून यात डार्क मोडसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

A new version of the MacOS system | मॅकओएस प्रणालीची नवीन आवृत्ती

मॅकओएस प्रणालीची नवीन आवृत्ती

Next

अ‍ॅपल कंपनीने आपल्या मॅकओएस या ऑपरेटींग सिस्टीमची मोजावे या नावाने नवीन आवृत्ती सादर केली असून यात डार्क मोडसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅपलच्या वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स-२०१८ ला प्रारंभ झाला असून याच्या प्रारंभी विविध महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यात आयओएस आणि मॅकओएस या ऑपरेटींग सिस्टीम्सच्या नवीन आवृत्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी मॅकओएस या प्रणालीची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याला मॅकओएस मोजावे या नावाने लाँच करण्यात आले आहे. मॅकओएस ही प्रणाली अ‍ॅपलच्या डेस्कटॉप संगणकांमध्ये वापरली जाते. याचीच मोजावे ही नवीन आवृत्ती असणार आहे. याला लवकरच बीटा स्वरूपात सादर करण्यात येणार असून वर्षाच्या अखेरीस सर्व युजर्ससाठी ही प्रणाली सादर करण्यात येईल असे अ‍ॅपलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

मॅकओएस मोजावे या प्रणालीत डार्क मोड प्रदान करण्यात आला आहे. याला ऑन केल्यानंतर संगणकाचा डिस्प्ले हा गडद रंगात परिवर्तीत होईल. अलीकडच्या काळात विविध स्मार्टफोन अ‍ॅप्समध्ये याला सादर करण्यात आले आहे. या अनुषंगाने अ‍ॅपलने आता याला डेस्कटॉपवर उपलब्ध केले आहे. याच्या सोबतीला या नवीन आवृत्तीमध्ये मॅक अ‍ॅप स्टोअरचे रिडिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये लवकरच नवीन अ‍ॅप्सचा समावेश करण्यात येणार आहे. यात अ‍ॅपल न्यूज, स्टॉक्स, व्हाईस मेमोज व होम आदी अ‍ॅप्सदेखील इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहेत. तर आयओएस १२ या प्रणालीतील ग्रुप फेसटाईम हे फिचरदेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये गोपनीयता आणि सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे याच्यासोबत देण्यात येणार्‍या सफारी ब्राऊजरमध्ये युजर्सच्या सुरक्षेसाठी खास सुविधा देण्यात आली आहे.

मॅकओएस मोजावे या आवृत्तीत स्क्रीनशॉटचे फिचर अद्ययावत करण्यात आले आहे. यात स्क्रीनशॉट घेण्यावर अधिक नियंत्रण प्रदान केलेले आहे. याच्या जोडीला स्क्रीन व्हिडीओ रेकॉर्डींगचे फिचरदेखील यात देण्यात आले आहे. यामध्ये कंटिन्युटी कॅमेरा हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याचा वापर करून युजर आपल्या नजीकच्या आयफोन वा आयपॅडमधील कॅमेर्‍यातून छायाचित्र घेऊ शकतो. 

Web Title: A new version of the MacOS system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.