मायक्रोसॉफ्टचे एज ब्राऊजर सर्वांसाठी खुले

By शेखर पाटील | Published: December 1, 2017 10:16 AM2017-12-01T10:16:34+5:302017-12-01T10:17:28+5:30

मायक्रोसॉफ्टने आपले एज हे ब्राऊजर अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींच्या सर्व युजर्ससाठी खुले केले आहे. आधी हे प्रयोगात्मक अवस्थेत उपलब्ध होते.

Microsoft's Edge Browser is open to all | मायक्रोसॉफ्टचे एज ब्राऊजर सर्वांसाठी खुले

मायक्रोसॉफ्टचे एज ब्राऊजर सर्वांसाठी खुले

googlenewsNext
ठळक मुद्देब्राऊजरच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट एज हे खूप मागे पडले आहे.गुगलचे क्रोम, मोझिलाचे फायरफॉक्स आणि अ‍ॅपलच्या सफारीसारख्या ब्राऊजर्सला ते टक्कर देणार असल्याचे मानले जात होते.

ब्राऊजरच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट एज हे खूप मागे पडले आहे. विशेष करून इंटरनेट एक्सप्लोअररच्या ऐवजी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० या प्रणालीसाठी एजची घोषणा केली होती तेव्हा एजपासून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. गुगलचे क्रोम, मोझिलाचे फायरफॉक्स आणि अ‍ॅपलच्या सफारीसारख्या ब्राऊजर्सला ते टक्कर देणार असल्याचे मानले जात होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे या सर्व ब्राऊजर्सला ते आव्हान देऊ शकले नाही. यातच मायक्रोसॉफ्टने स्मार्टफोन युजर्ससाठी हे ब्राऊजर सादर करण्यात बराच वेळ घालविला. मुळातच विंडोज प्रणालीवरील स्मार्टफोनच्या लोकप्रियतेच्या मर्यादा कधीच उघड झालेल्या असतांना एज हे ब्राऊजर अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसाठी तातडीने सादर करण्याची आवश्यकता होती. तथापि, यातही विलंब झाला. गेल्या काही आठवड्यांपासून मायक्रोसॉफ्टने या दोन्ही प्रणालींसाठी एज हे ब्राऊजर बीटा अवस्थेत उपलब्ध केले होते. आता मात्र हे ब्राऊजर या दोन्ही प्रणालीच्या प्रत्येक युजर्ससाठी खुले करण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्ट एजमध्ये संगणक आणि स्मार्टफोन यांच्यातील इंटर कनेक्टीव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे स्मार्टफोनवरील अ‍ॅप बंद करून ते संगणकावरील विंडोजमध्ये सुरू करण्याचे फिचर यात 'कंटिन्यू ऑन पीसी' या नावाने देण्यात आले आहे. याशिवाय यात स्मार्टफोन आणि पीसीमध्ये पासवर्ड, फेव्हरिटस्, रीडिंग लिस्ट आदी शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. सध्या भारतासह जगातील सर्व देशांमध्ये एज ब्राऊजरचे अ‍ॅप क्रमाक्रमाने सादर करण्यात येत आहे.

डाऊनलोड लिंक
अँड्रॉइड :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.emmx&hl=en

आयओएस:-
https://itunes.apple.com/app/id1288723196

पहा : मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊजरची थोडक्यात माहिती देणारा व्हिडीओ.

Web Title: Microsoft's Edge Browser is open to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.