ठळक मुद्देMeizu कंपनीचे तीन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँचMeizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे स्मार्टफोन्स आहेतएक्सक्लुझिव्ह स्वरुपात अॅमेझॉनवर विक्री

नवी दिल्ली : चीनची कंपनी Meizu भारतीय मार्केटमध्ये उतरली आहे. कंपनीने भारतात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे हे स्मार्टफोन्स आहेत. या तीन स्मार्टफोन्सची विक्री एक्सक्लुझिव्ह स्वरुपात अॅमेझॉनवर करण्यात येणार आहे. 

Meizu M6T या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. तर, Meizu M16TH स्मार्टफोन ग्राहक 39,999 रुपये खरेदी करु शकणार आहेत. या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोसोबत करार केला आहे. या करारानुसार, रिलायन्स जियोचे चॅनल पार्टनर्स देशभरात Meizu C9 ची विक्री करणार आहेत.

Meizu C9 स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. मात्र, Meizu C9 स्मार्टफोन ग्राहकांना अॅमेझॉन आणि रिलायन्स जिओच्या माध्यमातून स्पेशल इंट्रोडक्टरी ऑफरमध्ये सुरुवातीच्या दहा दिवसांत  4,999 रुपयांना मिळणार आहे. 

Meizu M6T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
-  13MP + 2MP चे दोन कॅमेरे
-  Sony IMX278 RGBW फोर-कलर सेन्सर
- मल्टी फ्रेम नॉयस रिडक्शन टेक्नोलॉजी 
- ऑक्टा-कोर प्रोसेसर 
-  फिंगरप्रिंट स्कॅनर 
- 3,300 mAh इतक्या क्षमतेची बॅटरी

Meizu M16TH स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
- 8GB रॅम
-  128GB  इंटरनल मेमरी
- 12MP आणि 20MP चे दोन कॅमेरे
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर 
- वाटर कूलिंग टेक्नॉलॉजी
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर 
- अॅन्ड्राईड 8.0 ओरियो बेस्ड  Flyme UI ऑपरेटिंग सिस्टिम
- 3,010mAh इतक्या क्षमेतची बॅटरी

Meizu C9 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
-  5.45 इंचाचा डिस्प्ले 
- अनलॉक फीचर्स 
- 3000 mAh बॅटरी
- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
 

English summary :
Chinese company Meizu has entered the Indian market. The company has launched three new smartphones in India. These are smartphones like Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9. These three smartphones will be sold exclusively on Amazon. Meizu M6T is priced at Rs 7,999. So, the Meizu M16th smartphone customers can buy Rs 39,999.


Web Title: Meizu unveils flagship 16th, m6t and C9 smartphones in India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.