स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 10:26 PM2018-09-15T22:26:44+5:302018-09-15T22:27:27+5:30

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात.

Many rumors about smart phone charging; Read whats the truth ... | स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

Next

एखाद्या प्रवासावेळी स्मार्ट फोनची बॅटरी अचानक संपली तर मिळेल त्या चार्जर किंवा पॉवर बँकने ती चार्ज करावी लागते. परंतू, त्यातून निघणाऱ्या वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. चला पाहूया काय खरे आहे ते. 


वारंवार चार्ज करणे 
एखाद्याला सवय असते की फोनची बॅटरी थोडीजरी कमी झाली तरीही फोन पुन्हा चार्जिंगला लावणे. बाहेर जायचे असल्यास बॅटरी अर्धी संपलेली असल्यास आपण दिवसातून एकदा तरी चार्जिंगला लावतोच. अशी वारंवार बॅटरी चार्ज केल्यास ती लवकर खराब होते, असे सांगितले जाते. खरे म्हणजे लिथिअम आयनच्या बॅटरीचे चार्जिंग सायकल ही काही लाखांत असते. म्हणजेच काही लाख वेळा ती चार्ज करता येते. आपण साधारण 2 ते 3 वर्षे मोबाईल वापरतो. यानंतर तो मोबाईल जुनाट होऊन जातो. दिवसातून तीन वेळा जरी बॅटरी चार्ज केल्यास ती लाख सायकलही पूर्ण करत नाही. यामुळे बॅटरी खराब होत नाही. 


चार्जिंगवेळी मोबाईल तापतो...
लिथियम-आयन बॅटरी ही 32 डीग्री फॅरनहाईट तापमानापेक्षा कमी तापमानामध्ये चार्ज करू नये. वारंवार कमी तापमानात चार्ज केल्यास अॅनोडवर लिथियम-आयनचा थर बनतो. त्याला हटविता येत नाही. यामुळे बॅटरीचे आयुष्य घटते. यामुळे मोबाईल चार्ज करत असताना तापणे ही बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगलेच असते. 

दुसऱ्या चार्जरद्वारे चार्जिंग
नव्या मोबाईलमधील बॅटरीमध्ये त्याला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा असते, जी बॅटरीला झेपू शकेल एवढाच विजेचा भार घेते. यामुळे जादा पावरच्या चार्जरद्वारे कमी पावरचा फोन चार्ज केल्यास त्याचा कोणताही परिणाम बॅटरीवर होत नाही. हा फोन त्याच्या ताकदीनुसार वीज घेतो. तसेच कमी पावरच्या चार्जरने जादा पावरचा फोन चार्ज केल्यासही काही परिणाम होत नाही. केवळ हळू चार्ज होते. यामुळे आयफोनलाही अँड्रॉईडचा चाजर दुसऱ्या केबलद्वारे लागू शकतो. 

अतिचार्जिंगमुळे स्फोट होतो
अतिचार्जिंग केल्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो असा समज आहे. मात्र, एकदा फोनची बॅटरी 100 टक्के चार्ज झाली की ती चार्ज होणे बंद करते. यामध्ये एक चीप बसवलेली असते जी अतिचार्जिंग होण्यापासून वाचवते. मात्र, रात्रभर चार्जिंगला लावल्यास फोन गरम होऊन बॅटरीचे आयुष्य घटू शकते. 

नवीन फोन फुल चार्ज करायलाच हवा का?
नवीन फोन पहिल्यांदाच पूर्ण चार्ज करण्यास सांगितले जाते. मात्र, ही बाब पाच, सहा वर्षांपूर्वी होती. आता नव्या तंत्रज्ञानाने युक्त लिथियम आयन बॅटरी आल्या आहेत. या बॅटरींना पूर्ण चार्ज करण्याची गरज भासत नाही. 


पूर्ण संपल्यावर चार्जिंगला लावणे
बॅटरी पूर्ण संपल्यानंतर बरेचजण बॅटरी चार्ज करतात. मात्र, असे केल्याने बॅटरीतील आयन कमजोर होतात. यामुळे 30 टक्क्यांवर बॅटरी असताना मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य ठरेल.

Web Title: Many rumors about smart phone charging; Read whats the truth ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.