'लोकमत'च्या बातम्या थेट तुमच्या खिशात; इन्स्टॉल करा नवं-कोरं, सोपं अन् सुपरफास्ट अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 03:54 PM2019-01-21T15:54:40+5:302019-01-21T16:55:49+5:30

आता जगभरातील, सर्व क्षेत्रातील घडामोडी आणि आपल्या महाराष्ट्रातील बित्तंबातमी अधिक वेगानं थेट तुमच्या खिशात पोहोचणार आहे

lokmat launched updated version of news app for android | 'लोकमत'च्या बातम्या थेट तुमच्या खिशात; इन्स्टॉल करा नवं-कोरं, सोपं अन् सुपरफास्ट अ‍ॅप

'लोकमत'च्या बातम्या थेट तुमच्या खिशात; इन्स्टॉल करा नवं-कोरं, सोपं अन् सुपरफास्ट अ‍ॅप

Next
ठळक मुद्दे'लोकमत'नं लाँच केलंय आपलं नवं-कोरं, सोपं-सुटसुटीत, आकर्षक अँड्रॉइड अ‍ॅप... जे ठेवेल तुम्हाला 'अ‍ॅपडेट'.हे नवं अ‍ॅप अद्ययावत आहेच, पण वापरायला अत्यंत सोपं, दिसायला नेटकं आणि अनेक उपयुक्त फीचर्सने सज्ज आहे. डेटाची बचत करण्यासाठीही काही पर्याय या अ‍ॅपमध्ये आहेत.

'महाराष्ट्रातील एक नंबरी वर्तमानपत्र', असं मानाचं बिरूद मिरवणारा, लोकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेला 'लोकमत' वृत्तसमूह www.lokmat.com या आपल्या वेबसाइटच्या माध्यमातूनही आपल्या वाचकांना २४x७ बातम्या पोहोचवण्याचं काम करतोय. आता जगभरातील, सर्व क्षेत्रातील घडामोडी आणि आपल्या महाराष्ट्रातील बित्तंबातमी अधिक वेगानं थेट तुमच्या खिशात पोहोचणार आहे आणि ती एका क्लिकवर तुम्हाला वाचायला मिळणार आहे. 'लोकमत'नं लाँच केलंय आपलं नवं-कोरं, सोपं-सुटसुटीत, आकर्षक अँड्रॉइड अ‍ॅप... जे ठेवेल तुम्हाला 'अ‍ॅपडेट'.

तुमच्याकडे लोकमत अ‍ॅपचं जुनं व्हर्जन असेल, तर ते अनइन्स्टॉल करून तुम्ही नवं व्हर्जन इन्स्टॉल करा किंवा ते अपडेट करा. हे नवं अ‍ॅप अद्ययावत आहेच, पण वापरायला अत्यंत सोपं, दिसायला नेटकं आणि अनेक उपयुक्त फीचर्सने सज्ज आहे. इथे तुम्ही मराठीसोबतच हिंदीतही बातम्या वाचू शकता. बातम्यांची नोटिफिकेशन मिळवण्याचा पर्यायही यात देण्यात आला आहे. आपण आपल्या आवडीची आर्टिकल केवळ टॅप करून फेव्हरिट फोल्डरमध्ये सेव्ह करू शकतो आणि सोयीनुसार ऑफलाइनही वाचू शकतो. फॉण्टचा आकार निवडण्याचा पर्याय अ‍ॅपमध्ये आहे. डेटाची बचत करण्यासाठीही काही पर्याय आहेत. या अ‍ॅपमधून बातम्या, लेख, व्हिडीओ, फोटो शेअर करणं अगदीच सोपं आहे. 

ही सगळी फीचर्स अशी सांगून, लिहून समजावण्यापेक्षा, लोकमत अ‍ॅप इन्स्टॉल करून तुम्ही स्वतःच ती वापरून पाहा. लोकमतचे सर्व प्रयोग तुमच्या प्रेमामुळे यशस्वी झालेत. तसंच हे अ‍ॅपही तुम्हाला नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे. त्यात काही कमतरता जाणवल्यास हक्काने कळवा. आम्ही त्या सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

चला तर मग,  इथे क्लिक करून इन्स्टॉल करा आपलं लोकमत अ‍ॅप...


 

Web Title: lokmat launched updated version of news app for android

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.