हसत-खेळत कोडींग शिकवणारे अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:51 PM2018-05-17T22:51:52+5:302018-05-17T22:51:52+5:30

गुगलने अतिशय सहजसोप्या पध्दतीने कोडींग शिकवण्याची सुविधा प्रदान करणारे ग्रासहॉपर हे अ‍ॅप सादर केले

Laugh-free app learning coding | हसत-खेळत कोडींग शिकवणारे अ‍ॅप

हसत-खेळत कोडींग शिकवणारे अ‍ॅप

googlenewsNext

मुंबई - गुगलने अतिशय सहजसोप्या पध्दतीने कोडींग शिकवण्याची सुविधा प्रदान करणारे ग्रासहॉपर हे अ‍ॅप सादर केले असून याला युजर्सचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

कोडींग म्हणजेच संगणकीय प्रोग्रॅमींग ही आधुनीक युगाची भाषा समजली जाते. तंत्रज्ञानाचा हा मूलभूत पाया समजला जातो. अगदी प्राथमिक ते अतिशय उच्च पातळीवरील कोडींग शिकण्याची सुविधा आपल्याला विविध माध्यमातून उपलब्ध आहे. यात विविध क्लासेसपासून ते पुस्तके, ऑनलाईन कोचींग, व्हिडीओज, ई-बुक्स, अ‍ॅप्स आदींचा समावेश आहे. मात्र गुगलने यापेक्षा अतिशय सुलभ पध्दतीत कोडींग शिकवण्यासाठी ग्रासहॉपर हे अ‍ॅप लाँच केले आहे. यात कुणीही कोडींगचे अगदी प्राथमिक ज्ञान नसतांनाही याला शिकू शकतो. याचा युजर इंटरफेस हा सुलभ असून तो कुणालाही समजू शकतो. 

गुगलच्या एरिया १२० या प्रयोगशील ग्रुपने ग्रासहॉपर हे अ‍ॅप विकसित केले आहे. याला अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. अर्थात गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरून कुणीही याला मोफत डाऊनलोड करून वापरू शकतो. आपण हे अ‍ॅप एकदा का इन्स्टॉल केले की, कोडींगच्या प्रशिक्षणास प्रारंभ करता येतो. यात प्रत्येक धड्याच्या प्रारंभी त्याची थोडक्यात माहिती दिलेली असते. यानंतर विविध क्विझच्या माध्यमातून तो धडा शिकवण्यात येतो. एक लेसन पूर्ण केल्यानंतर पुढील धडा शिकवण्याची सुविधा यात आहे. यामुळे युजर विविध पातळ्यांच्या माध्यमातून प्रोग्रॅमिंग शिकू शकतो. यानंतर युजर त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या मदतीने विविध अ‍ॅनिमेशन्स तयार करू शकतो. एका अर्थाने अतिशय मनोरंजक पध्दतीत कुणीही प्रोग्रॅमिंगचे प्राथमिक ज्ञान आणि यावर आधारित प्रॅक्टीकल्सच्या मिलाफाचा आनंद यातून घेऊ शकतो. ग्रासहॉपर अ‍ॅप अलीकडेच सादर करण्यात आले असून याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.

 

ग्रासहॉपर अ‍ॅप डाऊनलोड लिंक

अँड्रॉइड- https://play.google.com/store/apps/details?id=com.area120.grasshopper&hl=en_IN

आयओएस-https://itunes.apple.com/us/app/grasshopper-by-area-120/id1354133284?mt=8

Web Title: Laugh-free app learning coding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.