व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत होणार आयपीएलचे प्रक्षेपण

By शेखर पाटील | Published: January 19, 2018 01:46 PM2018-01-19T13:46:54+5:302018-01-19T13:53:51+5:30

भारतातील क्रिकेटवेडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच आयपीएलचे क्रिकेटला एक अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे रूपडे प्रदान केले आहे. आता याच आयपीएलला व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेचा नवीन आयाम मिळणार आहे.

IPL launches in virtual reality | व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत होणार आयपीएलचे प्रक्षेपण

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत होणार आयपीएलचे प्रक्षेपण

हॉटस्टार या अ‍ॅपवरून आगामी आयपीएलला आता व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजेच आभासी सत्यतेत पाहता येणार असून याबाबत नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भारतातील क्रिकेटवेडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच आयपीएलचे क्रिकेटला एक अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे रूपडे प्रदान केले आहे. आता याच आयपीएलला व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेचा नवीन आयाम मिळणार आहे. हॉटस्टार या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेला विवो आयपीएल-२०१८च्या डिजीटल प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले आहेत. अर्थात कुणीही स्मार्टफोन युजर या अ‍ॅपवरून आयपीएलचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतो. यात नवीन ते काय? असे कुणीही म्हणू शकेल. मात्र या वर्षी आयपीएलचे सर्व सामने आभासी सत्यतेत पाहता येणार आहे. म्हणजेच कुणीही व्हीआर हेडसेटमध्ये आपला स्मार्टफोन ठेवून ३६० अंशात आयपीएलचे सामने पाहू शकतो. एका अर्थाने कुणीही स्वत: जणू काही सामना होत असलेल्या स्टेडियममध्ये उपस्थित असल्याची अनुभूती यातून घेऊ शकतो. 

यात नियमित प्रक्षेपणाशिवाय विशेष कॅमेरे लावण्यात आले आहे. याच्या मदतीने युजरला अगदी जीवंतपणाची अनुभूती येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात एखादा क्षण पॉज करण्याची सुविधा दिलेली आहे. यानंतर स्मार्टफोन स्वाईप करून अथवा हलवून आपल्याला हव्या त्या कोनातून तो क्षण अनुभवू शकतो. तो आपल्याला हव्या त्या भाषेतील समालोचनाचा पर्याय निवडू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुणीही युजर आपल्याला हव्या त्या कॅमेर्‍यातून सामना अथवा त्यातील कोणताही क्षण पाहू शकतो. सामना पाहत असतांना कुणीही आपले मते हॉटस्टार अ‍ॅपवर व्यक्त करू शकतो. यासाठी खास क्रिकेटच्या इमोजी तयार करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या आयपीएलचे सामने ४ एप्रिल ते ३१ मे २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत. अर्थात सुमारे दोन महिने आयपीएल चालणार आहे. तथापि, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीतील प्रक्षेपणामुळे सुमारे सहा महिन्यांपर्यंत आयपीएलचे महोत्सवी वातावरण टिकवण्याची तयारी हॉटस्टारची मालकी असणार्‍या स्टार इंडियाने केली आहे. या माध्यमातून सुमारे ७० कोटी युजर्सपर्यत पोहचण्याची तयारीदेखील करण्यात येत आहे.

Web Title: IPL launches in virtual reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.