'अॅपल' घेणारे लोक जास्त समाधानी असतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:20 PM2018-11-07T15:20:17+5:302018-11-07T15:30:12+5:30

IPhone users are more satisfied than Android

IPhone users are more satisfied than Android | 'अॅपल' घेणारे लोक जास्त समाधानी असतात...

'अॅपल' घेणारे लोक जास्त समाधानी असतात...

Next

आयफोन आणि अँड्रॉईड वापरकर्त्यांमध्ये कायमच मतभेद होत असता. दोघेही स्व:ताला सरस मानतात. पण नुकत्याच एका स्लीकडील्स नावाच्या कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार अँड्रॉईड वापरणाऱ्यांपेक्षा आयफोन वापरणारेच जास्त समाधानी असल्याचे समोर आले आहे. 


या सर्व्हेमध्ये दोन्ही बाजुच्या प्रत्येकी 1000 वापरकर्त्यांची मते आजमावलेली आहेत. यामध्ये आयफोन वापरणारे खर्च, राहणीमान आदी मध्ये अँड्रॉईडवाल्यांपेक्षा जास्त चांगले आहेत. ते सामाजिक व्यवहारातही चांगले असतात. 


दोन्ही फोनचे वापरकर्ते फोनवर सारखाच वेळ व्यतीत करतात. मात्र, आयफोन वापरणाऱ्यांचा पगार आणि खर्च करण्याची क्षमता जास्त असते. तसेच आयफोन वापरणाऱ्यांचे मित्रही जास्त असतात. ते अनेक ठिकाणी फिरायला जातात. फोटो, सेल्फी घेण्याचे प्रमाणही अधिक असते. तर अँड्रॉईडचे वापरकर्ते मित्रांसोबत घरातच राहणे पसंत करतात, असेही समोर आले आहे. 

Web Title: IPhone users are more satisfied than Android

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.