20MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरी क्षमतेचा Infinix Hot S3 लॉन्च, किंमत फक्त 8,999

By ऑनलाइन लोकमत on Tue, February 06, 2018 4:17pm

इन्फिनिक्सने भारतात आपला नवा सेल्फी फोकस्ड Hot S3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे

नवी दिल्ली - हाँग काँगची स्मार्टफोन निर्माता इन्फिनिक्सने भारतात आपला नवा सेल्फी फोकस्ड Hot S3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. इन्फिनिक्सचा हा स्मार्टफोन 12 फेब्रुवारीपासून इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. महत्वाचं म्हणजे फ्लिपकार्टशिवाय अन्य कुठेही हा फोन उपलब्ध होणार आहे. इन्फिनिक्स Hot S3 अॅड्रॉइड 8.0 ओरियो वर आधारित आहे. दोन प्रकारात हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. 3GB रॅम/32GB इंटरनल स्टोरेज आणि 4GB रॅम/64GB इंटरनल स्टोरेजमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. 3GB रॅम असणा-या स्मार्टफोनची किंमत 8999 रुपये असणार आहे, तर 4GB रॅम मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. 

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं गेल्यास इन्फिनिक्स Hot S3 मध्ये 5.65 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचं रिज्योलूशन 1440x720 पिक्सल्स आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 18.9 चा बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. इन्फिनिक्सच्या या डिव्हाइसमध्ये  1.4 गीगाहट्स ऑक्टा-कोअर क्वॉलकम स्नॅपड्रेगर प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी  अॅड्र्यू 505 जीपीयू देण्यात आला आहे. 

फोटोसाठी ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सल बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 4000mAh पावरफूल बॅटरी आहे. कनेक्टिव्हीटीसाठी  4G VoLTE, वाय-फाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी सारखे फिचर आहेत. 

संबंधित

काय ! मोबाईलवरून डायरेक्ट प्रिंट पाठवायची ?
सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो आणि गॅलेक्सी जे 2च्या किंमतीत केली घट
तुमचा मोबाइल राहणार 10 अंकीच, एमटूएम मोबाइलच होणार १३ अंकांच
निश्चिंत राहा! तुमचा मोबाईल नंबर 10 अंकीच राहणार
एअरसेलच्या 5000 कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ?

तंत्रज्ञान कडून आणखी

नवीन मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो भारतात दाखल
काही मिनिटांतच OUT OF STOCK झाला शाओमीचा रेडमी नोट 5 
वाईड अँगल फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज सोनी एक्सपेरिया एल २
ओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती
पाकिस्तानाचा 4जी इंटरनेट स्पीड भारतापेक्षा दुप्पट

आणखी वाचा