एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 02:52 PM2018-07-23T14:52:23+5:302018-07-23T14:53:30+5:30

रांचीचा रोहित एलेक्सासोबत टेक्नॉलॉ़जीबाबत सुरुवातीपासून नेतृत्व करत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याला ही आयडिया स्टार ट्रेक हा सिनेमा पाहून आली होती. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी....

The Indian engineer Rohit Prasad who is the brain behind alexa | एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा

एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा

अमेझॉन कंपनीची व्हर्चुअल असिस्टेंट सर्व्हिस एलेक्सा सध्या सगळीकडेच गाजत आहे. पण ही आयडिया कुणाला आली असेल? हे जाणून घेतल्यावर तुम्हाला अधिक आनंद होईल. कारण हे तयार करणारा व्यक्ती एका भारतीय इंजिनिअरचं डोकं आहे आणि त्यांचं नाव रोहित प्रसाद आहे. रांचीचा रोहित एलेक्सासोबत टेक्नॉलॉ़जीबाबत सुरुवातीपासून नेतृत्व करत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याला ही आयडिया स्टार ट्रेक हा सिनेमा पाहून आली होती. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी....

२०१७ मध्ये रिसोड या टेक वेबसाइटकडून टेक, बिझनेस आणि मीडियाच्या १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत रोहित आणि त्याचा सहकारी टोनी रीड याला १५ व्या स्थानावर जागा दिली होती. याचं कारण या दोघांनी एलेक्सा घराघरात लोकप्रिय केलंय. या यादीच्या टॉप १५ मध्ये अॅमेझॉन आणि फेसबुकचे फाऊंडर यांचाही समावेश आहे. रोहितसोबत काम करणारा त्याचा सहकारी टोनी रीड हा ग्राहक अनुभवसंबंधी काम बघतो. 

रोहितच्या परिवारातील लोक आजही रांचीमध्ये राहतात. रोहित सुद्धा वर्षातून एकदा इथे येतो. टाईन्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहितने सांगितले की, त्याचे वडील MECON साठी काम करायचे. तर त्याचे आजोबा एचईसी या कंपनीसाठी काम करायचे. म्हणजे त्याच्या घरी इंजिनिअर्सच्या अनेक जनरेशन आहेत. 

रोहितने येथील डिएवी हायस्कूलधून शिक्षण घेतलं आहे. इंजिनिअरींग करत असताना आयआयटी रूडकीमध्ये त्याला संधी मिळाली होती. पण त्याने बीआयटी मेसराला प्राधान्य दिलं. त्याने इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशनमधून १९९७ मध्ये ड्रिग्री घेतली. त्यानंतर त्याने अमेरिकेतील इल्लिनोइस ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमएस करण्यासाठी गेला.  

गेली १४ वर्ष त्याने BBN टेक्नॉलॉजीसोबत काम केलं. २०१३ मध्ये त अॅमेझॉनसोबत जोडला गेला. दोन वर्षांआधी त्याला एलेक्सा आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा हेड सायंटिस्ट बनवलं. 

Web Title: The Indian engineer Rohit Prasad who is the brain behind alexa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.