Sarahah वर मेसेज पाठवणा-यांची ओळख करणार उघड, संस्थापकाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 03:59 PM2017-08-22T15:59:50+5:302017-08-22T16:01:18+5:30

सध्या फेसबूकवर ‘साराहाह’ या अॅपने धुमाकूळ घातला आहे

Identity of Sarahah users will be revealed | Sarahah वर मेसेज पाठवणा-यांची ओळख करणार उघड, संस्थापकाने केला खुलासा

Sarahah वर मेसेज पाठवणा-यांची ओळख करणार उघड, संस्थापकाने केला खुलासा

Next

मुंबई, दि. 22 - सध्या फेसबूकवर साराहाह या अॅपने धुमाकूळ घातला आहे. समोरच्या व्यक्तीला आपली ओळख न सांगता मत व्यक्त करायला मिळत असल्याने हे अॅप युजर्सच्या पसंतीस पडलं आहे. तसंच लोकांचं आपल्याबद्दल असणारं मत वाचायलाही युजर्सना आवडत असून मोठ्या प्रमाणात अॅप डाऊनलोड केलं जात आहे. अनेकजण आपलं प्रेम, भावना, आदर व्यक्त करत असताना गैरवापर करणा-यांची संख्याही तितकीच आहे. अनेकजण अश्लील कमेंट करत असून आपला रागही व्यक्त करत आहेत. मात्र तुम्ही जर अशा पद्धतीने अॅपचा वापर करत असाल तर सावधान राहण्याची गरज आहे, कारण अशा व्यक्तींची ओळख उघड करण्याचं निर्णय संस्थापकाने घेतला आहे. 

सौदीमधील जैनुल आबेदिन या व्यक्तीने हे अॅप डेव्हलप केलं आहे. एखाद्या व्यक्तीने नियमांचं उल्लंघन केलं असल्यास त्याची माहिती उघड केली जाईल असं जैनुल आबेदिनने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा किंवा पोलिसांनी जर तुमची माहिती मागितली, तर ती लपून राहिल हा तुमचा गैरसमज असेल. ही माहिती तात्काळ त्यांना पुरवली जाणार आहे. 

फेसबुकवर सौदी अरेबियाहून दाखल झालेले ‘साराहाह’ हे सोशल चॅटिंग अ‍ॅप फेसबुकवर धुमाकूळ घालत आहे. अगदी मिनिटा-मिनिटाला याविषयी फेसबुकवर चर्चा सुरू असून शेकडो कमेंट्स आणि पोस्ट्स वाढत आहेत. हे अ‍ॅप जगभरात फेसबुक आणि स्नॅपचॅटपेक्षाही जास्त लोकप्रिय असल्याचा दावा केला जात आहे. अरबी भाषेतून आलेल्या ‘साराहाह’ या शब्दाचा अर्थ ‘इमानदार’ ,प्रामाणिकअसा होतो. साराहाह हे अ‍ॅप जगभरात पसंत केले जात आहे. साधारण एक वर्षाआधी लॉन्च झालेल्या या अ‍ॅपला आतापर्यंत ३० कोटींपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

Sarahah चा कसा करायचा वापर ?
अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात आधी अकाऊंट तयार करा. त्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये आलेली मेसेज लिंक आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला आपोआप मेसेज मिळण्यास सुरुवात होईल. मात्र हे मेसेज तुम्हाला कोण पाठवत हे गुपीतच राहणार आहे. आणि हेच या अॅपचं वैशिष्ट्य आहे. 

डाटा चोरी होण्याची शक्यता
सायबर एक्स्पर्ट आणि डाटा सेक्युरिटी क्षेत्रातील संबंधितांनी या अॅपमुळे सुरक्षेला धोका होण्याची भीती नाकारली जाऊ शकत नाही. हे अॅप फक्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याची परवानगी जरी मागत असलं तरी यामुळे डाटा चोरी होण्याचं संकट येऊ शकतं. फक्त मौज-मजा म्हणून या अॅपसोबत जोडलं जाणं धोक्याचं ठरु शकतं असा दावा तज्ञांनी केला आहे. 
 

Web Title: Identity of Sarahah users will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.